एकीकडे राजकीय घराण्यांचे राजकारण; दुसरीकडे जम्मू – काश्मीरच्या राजौरीत वाहू लागली विकासाची गंगा


वृत्तसंस्था

राजौरी – एकीकडे पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, या विषयावर जम्मू – काश्मीरच्या राजकीय घराण्यांची राजकीय खलबते सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या मदतीने राजौरीसारख्या दुर्लक्षित जिल्ह्यात विकासाची गंगा वाहू लागली आहे. JK Local of Darhal block of Rajouri’s district say they’re getting proper water supply for farming with the help of small canals

जिथे पाण्याचे दुर्भिक्ष होते त्या राजौरी जिल्ह्यातील ध्रार ब्लॉकमध्ये आता छोटी धरणे आणि कालवे बांधून पूर्ण झाल्याने पाण्याचा मुबलक साठा झालाय आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलेय. त्यामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना याचा भरपूर लाभ मिळाला आहे.

राजौरी जिल्ह्यात छोट्या धरणांची आणि कालव्यांची शेतकऱ्यांची दीर्घकाळची मागणी राहिली होती. पण दहशतवादाच्या सावटाखाली आणि राजकीय अस्थिरतेमुळे ही मागणी अनेक वर्षे पूर्ण होत नव्हती. पण ३७० कलम हटले. राजौरी जिल्ह्यात अनेक अडलेल्या विकास कामांना वेग आला. त्यातून छोटी धरणे आणि कालवे गेल्या वर्षभरात बांधून पूर्ण झाले. पाण्याचे दुर्भिक्ष मिटले आणि शेतात पाणी पोहोचले, याविषयी स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

राजौरी जिल्ह्यात ४४००० हेक्टरमध्ये मका पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना मक्याचे ४००० क्विंटल हायब्रीड बीज देण्यात आले आहे. पण आम्ही शेतकऱ्यांना डाळींचे उत्पादन घेण्याला देखील प्रोत्साहन देत आहोत, असे राजौरीचे मुख्य कृषी अधिकाऱी महेश वर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

JK Local of Darhal block of Rajouri’s district say they’re getting proper water supply for farming with the help of small canals

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय