वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शनिवारी शेवटचा दिवस होता. लोकसभेत यादरम्यान राम मंदिरावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात सांगितले की, या 5 वर्षांत शतकातील सर्वात मोठे संकट मानव जातीने झेलले. बाहेर पडणेही कठीण होते तरीही अध्यक्षांनी देशाचे काम थांबू दिले नाही. त्या काळात भत्ता सोडण्यासाठी सर्व खासदारांचे कौतुक करतो.Government’s 5 years of Reform, Perform, Transform – PM Modi’s address in Parliament session
त्यांनी सांगितले की, 17व्या लोकसभेतील 5 वर्षे देशात सुधारणा, कामगिरी आणि रूपांतरणाचे होते. या सभागृहाने कलम 370 हटवले. तीन तलाकातून मुक्तता आणि नारीशक्तीच्या सन्मानाचे काम केले. देशाला जे नवे संसद भवन प्राप्त झाले त्या नव्या भवनात एका वारशाचा अंश आणि स्वातंत्र्याचा पहिला क्षण जिवंत ठेवण्यासाठी सेंगोल स्थापित करण्याचे काम केले.
नियम समान असावा : काँग्रेसने सभापतींना सांगितले
रालोदचे प्रमुख जयंत चौधरी यांनी आजोबा चरणसिंह यांना भारतरत्न दिल्याबद्दल बोलताना राज्यसभेत गदारोळ झाला. ते म्हणाले, पीएम मोदींचा निर्णय सध्याच्या सरकारच्या कार्यशैलीत चरणसिंह यांचे विचार प्रतिबिंबित करते. हे ‘ग्रासरूट सरकार’ आहे. कोणत्या नियमानुसार जयंत यांना बोलण्यास परवानगी दिली, असा सवाल काँग्रेसने केला.
‘नमो हॅट्ट्रिक’च्या हुडीत आले अनुराग ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर शनिवारी संसदेत ‘नमो हॅट्ट्रिक’ छापलेली हुडी घालून आले. ठाकूर म्हणााले, नमो हॅट्ट्रिक यासाठी आहे. कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. देश तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होत आहे. त्यांनी सांगितले की, तिसऱ्यांदा मोदी सरकार, ‘अबकी बार 400 पार’. त्यांनी सांगितले की, सरकारने 4 कोटी लोकांना पक्की घरे दिली.
राज्यसभेत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, श्वेतपत्रिका सरकारच्या आर्थिक अपयशाचे पत्र आहे. याद्वारे लोकांचे लक्ष बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेपासून भरकटवले जात आहे.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राज्यसभेत म्हणाल्या की, यूपीएच्या काळात ईशान्येचा पूर्ण विसर झाला. माजी पीएम डॉ. मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर आले. त्यांनी काही करायला हवे होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App