जम्मू- काश्मीमरध्ये कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांसाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. एखाद्या घरातील कर्ता कमावता मृत्यूमुखी पडला असेल तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठांना आयुष्यभरासाठी एक हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. त्यांच्या बालकांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.Government of Jammu and Kashmir extends helping hand to families of coroners, pensions to senior citizens and scholarships to children
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू- काश्मीमरध्ये कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांसाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.
एखाद्या घरातील कर्ता कमावता मृत्यूमुखी पडला असेल तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठांना आयुष्यभरासाठी एक हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. त्यांच्या बालकांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
जम्मू- काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही घोेषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने बालके निराधार झाली आहेत. त्यांच्यासाठी सरकारने विशेष शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे.
मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे की, आपल्यातील अनेक जणांचा कोरोनाने अकाली मृत्यू झाला आहे. सरकारने याबाबत ठरविले आहे की, कोरोनाने बळी गेलेल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचायचे आहे. या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सहाय्य केले जाणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. त्याचा गोरगरीबांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बांधकाम मजूर, पोनीवाला, पालखीवाला यांना दोन महिन्यांसाठी प्रति महिना एक हजार रुपये मदत केली जाणार आहे.
त्याचबरोबर सरकारने सर्व रेशन दुकानदारांना आदेश दिले आहेत की त्यांनी सर्व रेशनकार्डधारकांना तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करावा, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App