वृत्तसंस्था
काबूल : तालिबानकडून अफगाणिस्तान सरकारचे पाळेमुळे खणून काढण्याचे काम केले जात असताना सरकारची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी देखील सरकारी ईमेल हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गूगलने कार्यवाही करत अफगाणिस्तान सरकारचे सर्व ईमेल खाते ब्लॉक केले. या माहितीच्या आधारे तालिबानचे दहशतवादी सरकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती. Google blocked all govt emails in Afghanistan
१५ ऑगस्टला तालिबानने काबूलवर ताबा मिळवला. त्यानंतर तालिबानकडून अश्रफ घनी सरकारची माहिती गोळा केली जात असून यासाठी वेगवेगळ्या स्रोतांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले होते. याबाबतची कुणकूण काही देशांना देखील लागली होती. त्यामुळे हा डेटा चोरीस जाण्यापूर्वीच गूगलने अफगाण सरकारचे सर्व इमेल अकाउंट ब्लॉक केले. या कार्यवाहीमुळे आता कोणत्याही देशाचा डेटा चोरीस जाणार नाही आणि संवेदनशील माहिती तालिबानच्या हाती लागणार नाही.
अफगाणिस्तान सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती तालिबानकडून गोळा केली जात आहे. यात त्यांचे वेतन आणि अन्य माहितीचा समावेश होता. तालिबानच्या हाती ही माहिती लागली असती तर माजी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असता. परंतु आता गूगलने सरकारचे सर्व खाते गोठवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App