पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला धडकली मालगाडी; 5 जणांचा मृत्यू, 3 डबे रुळावरून घसरले

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन डबे रुळावरून घसरले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 ते 30 लोक जखमी झाले आहेत.Goods train hits Kanchenjunga Express in West Bengal; 5 killed, 3 coaches derailed

ट्रेन सियालदहला जात होती. ट्रेनच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर दोन बोगी एकमेकांवर चढल्या आहेत.



रंगपाणी ते निजबारी दरम्यान हा अपघात झाला.

जखमींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. बचावकार्यासाठी आपत्ती निवारण पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. घटनास्थळी रिलीफ ट्रेनही पाठवण्यात येत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटर वरील पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, कांचनजुंगा एक्सप्रेसला मालगाडी धडकली, या घटनेत जीवितहानी झाली आहे. घटनेची माहिती ऐकून दुःख होत आहे. घटनेनंतर जिल्हाधिकारी, पोलीस तसेच वैद्यकीय सहायता पथक आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी लगेच दाखल झाले आहे. या घटनेनंतर मदतीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Goods train hits Kanchenjunga Express in West Bengal; 5 killed, 3 coaches derailed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात