BHIM UPI App in Bhutan : डिजिटल इंडियाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या स्वदेशी डिजिटल पेमेंट अॅप (Digital Payment App) भीम यूपीआय (BHIM UPI)ने देशाबाहेर पाऊल ठेवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी आज व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या माध्यमातून भीम यूपीआयला भूतानमध्येही (Bhutan) लॉन्च केले आहे. यादरम्यान भूतानतर्फे अर्थमंत्री ल्योंपो नामगे शेरिंग (Lyonpo Namgay Tshering) हजर होते. यादरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले की, भीम यूपीआयला लॉन्च करण्यासाठी भूतानपेक्षा उत्तम दुसरा देश असू शकला नसता. यामुळे भारतीय पर्यटकांना कॅशलेस ट्रान्झॅक्शन्समध्येही मदत मिळेल. एवढेच नाही, यामुळे भारतीय व्यावसायिकांनाही थेट फायदा मिळेल. good news fm nirmala sitharaman launched bhim upi app in bhutan know who would get benefit digital payment app
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : डिजिटल इंडियाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या स्वदेशी डिजिटल पेमेंट अॅप (Digital Payment App) भीम यूपीआय (BHIM UPI)ने देशाबाहेर पाऊल ठेवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी आज व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या माध्यमातून भीम यूपीआयला भूतानमध्येही (Bhutan) लॉन्च केले आहे. यादरम्यान भूतानतर्फे अर्थमंत्री ल्योंपो नामगे शेरिंग (Lyonpo Namgay Tshering) हजर होते. यादरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले की, भीम यूपीआयला लॉन्च करण्यासाठी भूतानपेक्षा उत्तम दुसरा देश असू शकला नसता. यामुळे भारतीय पर्यटकांना कॅशलेस ट्रान्झॅक्शन्समध्येही मदत मिळेल. एवढेच नाही, यामुळे भारतीय व्यावसायिकांनाही थेट फायदा मिळेल.
BHIM-UPI is one of the achievements of India in terms of fintech in which India invested a lot & we've also encouraged our start-ups to come up with solutions. Therefore, BHIM-UPI stands out as one of the very good successful experiments that we've undertaken: Nirmala Sitharaman — ANI (@ANI) July 13, 2021
BHIM-UPI is one of the achievements of India in terms of fintech in which India invested a lot & we've also encouraged our start-ups to come up with solutions. Therefore, BHIM-UPI stands out as one of the very good successful experiments that we've undertaken: Nirmala Sitharaman
— ANI (@ANI) July 13, 2021
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, भीम यूपीआय आमच्याकडून करण्यात आलेल्या यशस्वी प्रयोगांपैकी एक आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) ने भूतानमध्ये भीम यूपीआय क्यूआर आधारित पेमेंट्स कार्यान्वित करण्यासाठी भूतानच्या रॉयल मॉनेटरी अथॉरिटी (RMA) च्या सोबत कराराची घोषणा केली आहे. भीम यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 41 लाख कोटी रुपयांच्या 22 अब्ज व्यवहरासांठी करण्यात आले आहे. पाच वर्षांत 1000 लाखाहून जास्त यूपीआय क्यूआर (UPI-QR) बनवण्यात आले आहेत.
BHIM UPI in 2020-21 has processed 22 billion transactions worth Rs 41 lakh crores. In five years, more than 100 million UPI QRs have been created. So, it is a proud product of India that we're sharing with Bhutan today: Nirmala Sitharaman — ANI (@ANI) July 13, 2021
BHIM UPI in 2020-21 has processed 22 billion transactions worth Rs 41 lakh crores. In five years, more than 100 million UPI QRs have been created. So, it is a proud product of India that we're sharing with Bhutan today: Nirmala Sitharaman
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, हे भारताचे गौरवास्पद उत्पादन आहे. जे आम्ही आता भूतानसोबत शेअर करत आहोत. दरम्यान, यापूर्वी रुपे कार्डलाही भूतानमध्ये लॉन्च करण्यात आले होते. 2019 मध्ये हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान यात्रेदरम्यान लाँच करण्यात आले होते. रुपे व्हिसा वा मास्टर कार्डसारखे एक इंडियन पेमेंट गेटवे आहे. सध्याच्या काळात रुपे यूएई, सिंगापूर, मालदीव आणि सौदी अरबसहित अनेक देशांत उपलब्ध आहे.
good news fm nirmala sitharaman launched bhim upi app in bhutan know who would get benefit digital payment app
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App