सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने मोदींच्या निर्णयावर टीका करणाऱ्या बरखा दत्त यांना फटकारले होते


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालणारा भालापटू नीरज चोप्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक आहे, अशी आठवण नेटकऱ्यां नी त्याचे जुने ट्विट पोस्ट करून दिली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये खेलो इंडियाच्या अ‍ॅपचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले होते.Gold medalist Neeraj Chopra had slammed Barkha Dutt for criticizing Modi’s decision.

यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असल्याने आपला एक पायलट पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याने कार्यक्रम रद्द करायला हवा होता असे म्हणत प्रसिध्द पत्रकार बरखा दत्त यांनी मोदींवर टीका केली होती. खेळाच्या माध्यमातून तरुणांना जोडण्यासाठी हिच योग्य वेळ असल्याचे म्हणत नीरज चोप्राने बरखा दत्तला फटकारले होते.

फेब्रुवारी २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने हल्ला केला होता. भारताचे पायलट अभिनंदन वर्धमान यांचे विमान पडल्यानंतर पाकिस्तानने त्यांना पकडले होते. हे कारण देऊन बरखा दत्त यांनी मोदी सरकारच्या खेलो इंडियाच्या कार्यक्रमावर टीका केली होती.यावेळी बरखा दत्त यांना उत्तर देताना नीरज चोप्रा म्हणाला होता, खेळांमुळे तरुण एकत्र येतात. त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते. हे करण्यासाठी आतापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. हा एक चांगला उपक्रम आहे आणि त्यावर टीका करणे दु: खद आहे, असे तो म्हणाला होता.

नीरज चोप्रा याचे जुने ट्विट नेटकºयांनी ट्विट केले आहेत. यातून नीरज मोदींचा कट्टर समर्थक असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतील दैदीप्यमान विजयानंतर नीरजने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. आपला देश तुमच्या समर्थ नेतृत्वाखाली प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास नीरजने व्यक्त केला होता. पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळात मदतीसाठी सुरू केलेल्या पीएम केअर फंडासाठी नीरजने दोन लाख रुपयांची देणगी दिली होती. त्याचबरोबर हरियाणाच्या मुख्यमंत्री निधीसाठी एक लाख रुपयांची मदत केली होती.

टोकियो ऑलिम्पिकच्या पूर्वी नीरजने पंतप्रधानांचे त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले होते. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्याबद्दल मोदी सरकारचे नीरजने आभार मानले होते. युरोपमध्ये कठोर व्हिसा नियम असूनही प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी भारत सरकारने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. माझ्या सर्व गरजांची शक्य तेवढी काळजी घेतली आहे. त्यामुळे सरकारचे मी आभार मानतो, असे तो म्हणाला होता.

विशेष म्हणजेटोकियो ऑलिम्पिकच्या आधी पंतप्रधान मोदींनी वैयक्तिकरित्या नीरज चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबाशी बोलून शुभेच्छा दिल्या होत्या. नीरजशी संवाद साधताना मोदी म्हणाले होते, मला सांगितले गेले की तुम्ही जखमी झाला आहात. पण तरीही तुम्ही एक नवीन विक्रम केला.

अपेक्षांचे ओझे घेऊ नका, फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. यावर नीराज म्हणाला होता, मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. मला जे हवे आहे त्यासाठी सरकार पूर्ण मदत करत आहे. दुखापतीमुळे, मी काही वेळ गमावला, पण माझे पूर्ण लक्ष ऑ लिम्पिकवर आहे. कोरोनामुळे ऑलिम्पिक पुढे ढकलले गेले, पण तरीही मी सराव करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे सुवर्णपदक जिंकल्यावर जेव्हा त्याला पंतप्रधानांनी फोन केला त्यावेळी त्याच्या भावना उचंबळून आल्या होत्या. पंतप्रधान आणि नीरज यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: नमस्ते
 • नीरज: नमस्ते सर
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: तुला खूप खूप शुभेच्छा
 • नीरज: धन्यवाद सर
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: ऑलिम्पिक समारोपाच्या दिशेने जात आहे आणि तू देशाला खूश केलं आहेस.
 • नीरज: भारतासाठी मला काहीतरी करायचं होतं. मला सुवर्ण जिंकायचं होतं. मला सर्व भारतीयांचा पाठिंबा होता. तुम्ही सुद्धा स्पर्धा बघत होतात. खूप चांगलं वाटलं.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: पानीपतने पाणी दाखवलं.
 • नीरज: हाहाहाहा, सर्वांचे आशीर्वाद कामी आले.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: ऑलिम्पिक एक वर्ष उशिराने झाल्याने एक वर्ष अधिक मेहनत घ्यावी लागली. करोनामुळे अनेक संकटं आली. मध्यंतरी तुला दुखापतही झाली होती. त्यावर मात करत तू चांगली कामगिरी केली. हे सर्व तुझ्या मेहनतीचं फळ आहे.
 • नीरज: हो सर, दुखापत झाल्याने कसं कमबॅक करायचं हा प्रश्न होता
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: ज्या दिवशी तू जाणार होता आणि माझी तुझ्या सोबत चर्चा झाली. मी बघितली की तुझ्या चेहऱ्यावर एकदम आत्मविश्वास होता. तुझ्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता. तुझ्या वर कोणतंच दडपण दिसलं नाही. विशेष म्हणजे आनंद घेत खेळत होता.
 • नीरज: मी माझं १०० टक्के दिलं आणि देशासाठी सुवर्ण पदक पटकावलं.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: तु देशाचं नाव केलं आहेस. तुझ्यामुळे तरुणांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळेल. टोक्योत आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
 • नीरज: नक्कीच आपला भारत भविष्यात क्रीडाक्षेत्रात चांगली कामगिरी करेल
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: तू तर सैनिक आहेस, आणखी मुलांना घडवशील यात शंका नाही.
 • नीरज: नक्कीच
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: तुझ्या आई वडिलांना माज्याकडून नमस्कार सांग, हा खूपच आनंदाचा क्षण आहे. राधाकिशनला सुद्धा माझ्या कडून शुभेच्छा दे.
 • नीरज: हो नक्की
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: त्यांनी पण तुझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. १५ ऑ गस्टला आपण भेटतोय.
 • नीरज: नक्की
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी: खूप खूप शुभेच्छा

Gold medalist Neeraj Chopra had slammed Barkha Dutt for criticizing Modi’s decision.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*