वृत्तसंस्था
बंगळुरु : कर्नाटक सरकारने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं कडक लॉकडाऊन केला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या मुलाने चक्क मंदिरात प्रवेश करून सपत्नीक दर्शन घेऊन लॉकडाऊनचे नियम मोडले आहेत. From the son of the Chief Minister of Karnataka Darshan with entrance to the temple
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांचे पुत्र बी.वाय. विजेंद्रा यांनी नांजुनागुड येथील श्रीकंटेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्याचं वृत्त आहे. विजेंद्र यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या.
कर्नाटक सरकारने आवश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर 24 मे पर्यंत बंदी घातली आहे. सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच नियम मोडून मंदिरात दर्शन घेतल्यावर टीका सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App