अदानी, रामचरित मानस ते बागेश्वर धाम; आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय टूलकिटचा “प्रताप”!!


विशेष प्रतिनिधी

अदानी, रामचरित मानस ते बागेश्वर धाम आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय टूलकिटचा “प्रताप”!! हे शीर्षक वाचून काही वेगळे जरूर वाटू शकते. अदानी, रामचरित मानस आणि बागेश्वर धाम यांच्यात तसे साम्य देखील काही नाही. पण हे तिन्ही वेगवेगळे विषय गेल्या काही दिवसांपासून भारतात मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियात जोरदार चर्चेचे आहेत. तरी देखील यात एक विलक्षण धागा अथवा सूत्र देखील आहे आणि तो धागा थेट भारतीय राष्ट्रवादाशी किंवा भारतीय ओळखीशी जोडले आहे. From adani, ramcharitmanas to bageshwar dham; international – national toolkit works to demoralise Indian nationalism

घरवापसी आणि बागेश्वर धाम बदनामी

… आणि म्हणूनच त्या गोष्टींचा संबंध आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय टूलकिटशी आहे. बागेश्वर धामचा विषय धीरेंद्र शास्त्री यांच्यावरून सुरू झाला. ते ख्रिश्चन धर्मांतरित आदिवासींचे हिंदू धर्मात घरवापसीचे यशस्वी काम करतात हे पाहून त्यांच्यातल्या उणीवा शोधून माध्यमांनी त्या मुद्दामून मॅग्निफाईंग ग्लास मधून दाखवल्या. घरवापसीच्या कार्याला थेट टार्गेट करता येईनासे झाल्यावर माध्यमांनी चमत्काराचे वेगळे रूप त्याला जोडले. मग श्याम मानव यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना अंधश्रद्धा – चमत्कार या विषयावर आव्हान दिले. पण हेच ते श्याम मानव आहेत, जे नुकतेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले होते. हा विषय जेव्हा एक्स्पोज झाला, त्यानंतर बागेश्वर धामचा विषय मागे पडला.

 महाराष्ट्रात विषय पेटवला

पण धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांच्या पत्नी विषयी काही अनुदार उद्गार काढण्याचा मुद्दा महाराष्ट्रात पेटवायचा प्रयत्न झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशेषत्वाने आघाडीवर दिसले. धीरेंद्र शास्त्रींनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नी विषयी गैरउद्गार काढले त्याचे समर्थन करण्याचे अजिबात कारण नाही. तसा हेतेही नाही. पण हा विषय पेटवण्यात राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर राहिले ही वस्तुस्थिती पण नाकारण्याचे कारण नाही.

 रामचरित मानस वाद काढला उकरून

जे बागेश्वर धामचे, तेच महान संत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस या ग्रंथाचे. हा ग्रंथ दलित आणि स्त्रियांविरोधात असल्याचा जावई शोध समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी लावला. त्याला बिहार मधल्या नेत्यांची साथ मिळाली आणि आता तर थेट अखिलेश यादव हे उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनात हा विषय उपस्थित करणार असल्याचे म्हणाले आहेत.

 हिंदू एकजूट खूपतीय डोळ्यात

अयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न साकार होत असताना सर्व हिंदूंची एकजूट घट्ट होत असताना दलित, स्त्रिया, ओबीसी अशा असे विषय काढून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे हे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांचे टूलकिट आहे. रामचरित मानस ग्रंथ शेकडो वर्षे जुना आहे. त्यातील चौपाया घराघरात गायल्या जातात. पण त्यातला विशिष्टच भाग उचलून गोस्वामी तुलसीदास यांच्यासारख्या महान संताला बदनाम करण्याचे कारस्थान आणि त्यानिमित्ताने हिंदू समाजात फूट पाडण्याचे मनसूबे समाजवादी पक्ष, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि लालूप्रसादांचा राष्ट्रीय जनता दल यांच्यासारख्या समाजवादी कुळाच्या नेत्यांनी रचला आहे. महाराष्ट्रात त्यांना राष्ट्रवादीची साथ मिळते आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात हे कारस्थान सुरू होते आहे.

 अदानी समूह आणि हिंडेनबर्ग रिसर्च

अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीने विशिष्ट पेपर्स प्रसिद्ध करून त्यांच्या माल प्रॅक्टिसेस उघड केल्याचा दावा केला आहे. बँकांना मॅनेज करून अदानी समूहाने आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअरचे दर तब्बल 85 % वाढवण्याचा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीने प्रसिद्ध केल्यानंतर अदानी ग्रुपला शेअर बाजारात मोठा फटका बसला. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या मोठ्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या. शेअर बाजारात हलकल्लोळ माजला. पण हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा इतिहास धुंडाळल्यानंतर काही वेगळेच सत्य यातून बाहेर आल्याचे दिसते.

 गुंतवणुकीला पायबंदाचा मनसुबा

अदानी ग्रुप जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः दक्षिण पूर्वेकडील देशांमध्ये मोठी गुंतवणूक वाढवू इच्छित आहे, तेव्हाच त्या ग्रुपवर आर्थिक आघात करण्याचा हा डाव आहे. श्रीलंकेतील पोर्ट मध्ये अदानींची गुंतवणूक चीनला नको आहे. पॅसिफिक महासागरातील आसियान देशात अदानींसारख्या मोठ्या ग्रुपने गुंतवणुकीची स्पर्धा निर्माण करणे चीनला टाळायचे आहे. त्यातून हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसी सारखे टूलकिट कार्यरत झाले आहे.

 हिंडेनबर्ग काळी हिस्टरी

हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीने शॉर्ट टर्म सेलिंग सारखी हत्यारे वापरून एलन मस्क आणि टेस्ला सारख्या कंपन्यांनाही त्रास दिल्याचे उघड झाले आहेच. अमेरिकेत हिंडेनबर्ग विरुद्धची चौकशी एफबीआय सारखी संस्था करत आहे आणि अशातच भारतातल्या अदानी ग्रुप विरुद्ध इंडियनवर रिसर्च एलसीसीचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. अदानी ग्रुपची संपत्ती तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरली आहे. याचा अर्थ अदानी ग्रुपची प्रत्यक्ष घसरण झाली असा नव्हे, पण यानिमित्ताने शेअर घसरून अप्पर सर्किट लागल्याच्या फेक न्यूजही पसरवण्यात आल्या.



 काँग्रेसच्या देणग्या घटल्या

ज्यावेळी काँग्रेस सारख्या पक्षाच्या अधिकृत देण्ग्या घटून तो राष्ट्रीय पक्षांमध्ये देखील तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, अशावेळी काँग्रेसचे नेते देशातल्या दोन-तीन उद्योगपतींना टार्गेट करत गेले वर्षभर कॅम्पेन चालवत आहेत. त्यातच आता हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीच्या अहवालाची भर पडली आहे. लेफ्ट लिबरल माध्यमांनी हा विषय फारच उचलून धरला आहे. दरम्यानच्या काळात नरेंद्र मोदींवरचा बीबीसी डॉक्युमेंटरीचा विषय वादग्रस्त ठरला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हैदराबाद विद्यापीठ आणि जामिया मिलीया विद्यापीठ या तीन विद्यापीठांमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग झाले आहे. या विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर तेथे कोणते टूलकिट कार्यरत आहे??, हे प्रत्येकाला माहिती आहे. ते वेगळे सांगण्याची गरज नाही!!

 बड्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाला दगा

हे सगळे विषय आंतरराष्ट्रीय आणि त्यांना साथ देणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील टूलकिटचा भाग आहेत. भारत आज सोलर एनर्जी, ग्रीन टेक्नॉलॉजी, फार्मा आणि इन्फ्रास्ट्रक्चर या चार उद्योगक्षेत्रात जगाला मागे टाकून पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत आणि अशावेळी अदानी सारखा ग्रुप या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा इरादा राखत असताना हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा अहवाल प्रसिद्ध होणे यातून हे टूलकिट भारतातल्या बड्या गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी पुढे सरकले आहे.

From adani, ramcharitmanas to bageshwar dham; international – national toolkit works to demoralise Indian nationalism

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात