Freedom of reverse Talaq : एखाद्या मुस्लिम महिलेला कोर्टाबाहेर आपल्या पतीला एकतर्फी तलाक देण्याचा अधिकार आहे. याला खुला म्हटले जाते. केरळ हायकोर्टाने याला कायदेशीररीत्या वैध मानले आहे. न्या. ए. मुहम्मद मुस्तकीम आणि न्या. सीएस डायस यांच्या खंडपीठाने मुस्लिम पुरुषांसाठी उपलब्ध तलाकच्या अधिकारासाठी खुलाची बरोबरी केली आहे. यासाठी 1972 च्या निर्णयाला (केसी मोयिन विरुद्ध नफिसा आणि इतर) चुकीचे ठरवण्यात आले, यात मुस्लिम महिलांना अशा अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते. Freedom of reverse Talaq for Muslim women, important decision by the Kerala High Court
विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : एखाद्या मुस्लिम महिलेला कोर्टाबाहेर आपल्या पतीला एकतर्फी तलाक देण्याचा अधिकार आहे. याला खुला म्हटले जाते. केरळ हायकोर्टाने याला कायदेशीररीत्या वैध मानले आहे. न्या. ए. मुहम्मद मुस्तकीम आणि न्या. सीएस डायस यांच्या खंडपीठाने मुस्लिम पुरुषांसाठी उपलब्ध तलाकच्या अधिकारासाठी खुलाची बरोबरी केली आहे. यासाठी 1972 च्या निर्णयाला (केसी मोयिन विरुद्ध नफिसा आणि इतर) चुकीचे ठरवण्यात आले, यात मुस्लिम महिलांना अशा अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते.
1972च्या निर्णयात एकसदस्यीय पीठाने म्हटले होते की, एक मुस्लिम महिला आपल्या पतीला कोर्टाच्या बाहेर तलाक देऊ शकत नाही. मुस्लिम पुरुषांना या माध्यमातून तलाक देण्याची अनुमती आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, महिलांनी मुस्लिम विवाह विघटन अधिनियम 1939 (DMMA) अंतर्गत कोर्टाची पायरी चढणे आवश्यक आहे.
अपीलच्या एका बॅचवर विचार केल्यानंतर, डिव्हिजन बेंचने म्हटले की, DMMA केवळ फास्खला नियंत्रित करते. कोर्ट यामध्ये दिलेल्या कारणांच्या वैधतेवर निर्णय देते. कोर्टाने म्हटले की, अतिरिक्त न्यायिक तलाकच्या इतर पद्धती (तल्ख-ए-तफ़विज़, ख़ुला आणि मुबारत) मुस्लिम महिलांसाठी उपलब्ध आहेत, जसे शरीयत अधिनियमच्या कलम 2 मध्ये याचा उल्लेख आहे.
तलाक-ए-तफ़वीज़ एका अनुबंधावर आधारित आहे. पतीद्वारे अनुबंधाच्या शर्थींचं उल्लंघन केल्यास पत्नी तलाक प्राप्त करू शकते. मुबारातमध्ये आपसातील सहमतीने वेगळे होण्याची तरतूद आहे.
कोर्टाने म्हटले की, “खुला तलाकचे एक रूप म्हणजे पत्नीला पतीप्रमाणेच तलाक देण्याचा अधिकार आहे. तलाकच्या एका रूपात खुलाची मान्यता थेट पवित्र कुराणातून उपलब्ध आहे. अध्याय II छंद 228-229 मध्ये याचा उल्लेख आहे. कुराण पती आणि पत्नी दोघांनाही तलाक देण्याचा अधिकार देते.”
कोर्टाने म्हटले की, पतीची सहमती प्राप्त करणे यात गरजेचे नाही. पत्नीला डावर परत करण्याची बाध्यता निष्पक्षतेच्या सिद्धांतावर आधारित आहे. जी कुराणमध्ये पाहण्याची आज्ञा आहे. कोर्टाने म्हटले की, जर पत्नीने मेहर परत करण्यास नकार दिला, तर पती कोर्टात दाद मागू शकतो.
Freedom of reverse Talaq for Muslim women, important decision by the Kerala High Court
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App