अध्य कुलभूष तू भीमराजा ! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त मानवंदना


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंतीभारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी जयंती आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरी करण्याचं आवाहन केलं जात आहे. Adhya Kulbhush Tu Bhim Raja! The sculptor of the Indian Constitution, the great man Dr. Tribute to Babasaheb Ambedkar on the occasion of his 130th birth anniversary


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद :आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती .यावर्षी आनंदात भर टाकत केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फ़ोट झाल्याने सर्वच आज आप आपल्या घरातून बाबासाहेबाना अभिवादन करत आहेत.

आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते .या गीताला सार्थ ठरवत भाकरीवर बाबासाहेब साकारलेत चांदवडचे शिक्षक देव हिरे यांनी.

भाकरीवर बाबासाहेबांची रांगोळी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी आगळीवेगळी अशी बाजरीच्या भाकरीवर रांगोळी साकारली आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अनमोल कार्य बाबासाहेबांनी केलं.

“आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे” या प्रसिध्द गीताचे शब्द बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. याच गीताच्या आधारावर देव हिरे यांनी आठ इंच व्यासाच्या भाकरीवर सहा इंच व्यासाची पोर्ट्रेट रांगोळी साकारत त्यावर बाबासाहेबांची सही काढली आहे. आजपर्यंत अशी कलाकृती साकारलेली नाही. कला शिक्षक देव हिरे यांनी ही आगळी-वेगळी कलाकृती साकारत महामानवाला अनोखं अभिवादन केलं आहे . मागील वर्षी त्यांनी पाण्यात बाबासाहेबांची रांगोळी साकारली होती.

 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती आहे. कोरोनामुळे यंदाही गर्दी न करता घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. मात्र राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता कुठे रक्तदान तर कुठे भाकरीवर रांगोळी साकारुन बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी 10.55 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर 

दरवर्षी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकरी जनतेची गर्दी होत असते. यंदा मात्र अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता घरातूनच जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा चैत्यभूमी परिसरात लावण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी 10.55 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही महामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर जातील.

आंबेडकर जंयतीदिनी बाबासाहेब यांच्या चैत्यभूमी इथल्या स्मारकस्थळावरुन थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांचं प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे केल जाणार आहे.

Adhya Kulbhush Tu Bhim Raja! The sculptor of the Indian Constitution, the great man Dr. Tribute to Babasaheb Ambedkar on the occasion of his 130th birth anniversary

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात