India Is important than Other as US seeks to counter China, US Think Tank Report

उदयोन्मुख चीनला रोखायचे असेल, तर अमेरिकेसाठी भारतासारखा दुसरा महत्त्वाचा देश नाही

US Think Tank Report : विज्ञान आणि तंत्रज्ञान (आयटी) धोरणातील मुख्य अमेरिकन थिंक टँकचे म्हणणे आहे की, अमेरिकेला उदयोन्मुख चीनला रोखायचे असेल तर भारतासारखा दुसरा कोणताही देश महत्त्वाचा नाही. भारताकडे अत्यंत कुशल तांत्रिक व्यावसायिक आहेत. त्यांचे अमेरिकेशी मजबूत राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत. थिंक टँक ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फाउंडेशन’ (आयटीआयएफ) यांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली. India Is important than Other as US seeks to counter China, US Think Tank Report


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : विज्ञान आणि तंत्रज्ञान (आयटी) धोरणातील मुख्य अमेरिकन थिंक टँकचे म्हणणे आहे की, अमेरिकेला उदयोन्मुख चीनला रोखायचे असेल तर भारतासारखा दुसरा कोणताही देश महत्त्वाचा नाही. भारताकडे अत्यंत कुशल तांत्रिक व्यावसायिक आहेत. त्यांचे अमेरिकेशी मजबूत राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत. थिंक टँक ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फाउंडेशन’ (आयटीआयएफ) यांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली.

बौद्धिक संपदा, डेटा हाताळणी, फी, कर, स्थानिक सामग्रीची आवश्यकता किंवा वैयक्तिक गोपनीयता यासारख्या बाबींमध्ये दोन्ही देशांमध्ये मोठे मतभेद निर्माण झाल्यास अमेरिकेने भारतावर ‘अत्यंत अवलंबून’ असण्याबाबत इशाराही त्यांनी दिला. जर तसे झाले तर आयसी सेवा प्रदाता भारत एक मुत्सद्दी समस्या बनू शकतो.

अहवालात सर्वात वाईट आणि सर्वोत्कृष्ट परिस्थितींवर विचार करण्यात आला आहे. भारत आणि चीनमधील तणाव कमी करून आणि दोन्ही शेजारी देशांमधील व्यावसायिक संबंध अधिक बळकट असणे अशीसुद्धा एक परिस्थिती असू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. अशा परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्था पूर्वेकडे सरकेल आणि अमेरिका यात विशेष काही करू शकणार नाही.

या अहवालानुसार दुसरे परिदृश्य म्हणजे, चीनमुळे आर्थिक, लष्करी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांशी संबंधित वाढत्या आव्हानांमध्ये भारत आणि अमेरिकेच हितसंबंध समान असावेत. अशा परिस्थितीत बहुतांश विकसनशील देशांमध्ये लोकशाही नियमांचे वर्चस्व राहील, कारण विकसनशील देश ‘बीजिंग मॉडेल’ऐवजी ‘दिल्ली मॉडेल’कडे पाहतील.

थिंक टँकने म्हटले आहे की, “उदयोन्मुख चीनला अमेरिकेला रोखायचे असेल तर भारतापेक्षा महत्त्वाचा दुसरा कोणताही देश नाही जो आकाराने फार मोठा आहे, अत्यंत कुशल तांत्रिक व्यावसायिक आहेत आणि अमेरिकेबरोबर त्यांचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत.”

आयटीआयएफचे सदस्य आणि या अहवालाचे सहलेखक डेव्हिड मोशेला म्हणाले की, ज्या शक्तींमुळे अमेरिका आणि चीनमध्ये मतभेद वाढत आहेत, त्याच शक्तींमुळे अमेरिका आणि भारत जवळ येत आहेत. ते म्हणाले, “अमेरिका, भारत आणि चीन यांच्यातील संबंध येत्या कित्येक वर्षांपर्यंत जागतिक स्पर्धा आणि डिजिटल नवकल्पनेला आकार देतील. व्यापक संभाव्य परिस्थितीत दोन गोष्टी स्पष्ट आहेत, भारताने चीनचा सामना करण्याची आणि त्यावरील आपले अवलंबन कमी करण्याची गरज आहे.” अमेरिकेचे प्रयत्न याचा एक महत्त्वाचा भाग असावेत आणि यामुळे अमेरिकेच्या जागतिक अवलंबित्व विनिर्माणापासून सेवाक्षेत्रापर्यंत जरूर वाढेल.”

या अहवालात असे म्हटले आहे की संशोधन व विकास, नावीन्यपूर्ण केंद्रे, यंत्रांशी संबंधित माहिती, विश्लेषण, उत्पादनाच्या डिझाइन व अन्वेषण आणि आयटी आणि जीवशास्त्र यासह विविध क्षेत्रांत भारत महत्त्वपूर्ण प्रगती करत आहे.

India Is important than Other as US seeks to counter China, US Think Tank Report

महत्त्वाच्या बातम्या

Corona Updates : देशात 24 तासांत कोरोनाचे 1.85 लाखांहून जास्त नवे रुग्ण, 1000 हून जास्त मृत्यू

महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाचा विळखा ; वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत अधिकच भर

जगातील कोणतीही कोरोनाविरोधी लस भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा

मुंबईमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

या सेवा व कार्यालयांना वगळले आहे अप्रत्यक्ष लॉकडाऊनमधून…