Free remdesivir injection And Oxygen : देशभरात एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मारामार सुरू आहे. ऑक्सिजनचाही तुटवडा असल्याची ओरड होत आहे. ज्या ठिकाणी हे उपलब्ध होतंय तेही चढ्या दराने. काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा किमतीत इंजेक्शनची विक्री केली जातेय. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. परंतु दादरा-नगर हवेली व दमण दीव या केंद्रशासित प्रदेशात मात्र या दोन्ही गोष्टी रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. Free remdesivir injection And Oxygen To All, Daman-Diu administrator Praful Patel made historic decision
विशेष प्रतिनिधी
दमण : देशभरात एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मारामार सुरू आहे. ऑक्सिजनचाही तुटवडा असल्याची ओरड होत आहे. ज्या ठिकाणी हे उपलब्ध होतंय तेही चढ्या दराने. काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा किमतीत इंजेक्शनची विक्री केली जातेय. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. परंतु दादरा-नगर हवेली व दमण दीव या केंद्रशासित प्रदेशात मात्र या दोन्ही गोष्टी रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण-दीवचे प्रशासक प्रफुल पटेल यांनी जनहिताचा निर्णय घेत दादरा नगर हवेली आणि दमण जिल्ह्याच्या खासगी रुग्णालयांत कोरोना उपचारांना मंजुरी देत असतानाच प्रशासनातर्फे रुग्णांसाठी आवश्यक ठरलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मोफत उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे.
कोरोना काल में दादरा नगर हवेली और दीव -दमन के नागरिकों के लाभ हेतु अब मरीजों को रेमडेसिवीर इंजेक्शन और ऑक्सीजन प्रशासन द्वारा मुफ्त दिया जाएगा। और लोगों का निजी अस्पतालों में भी इलाज किया जायेगा। ताकि मरीजों को बेहतर सुविधा मिल पाए। @PMOIndia pic.twitter.com/9gAbri4qwk — Praful K Patel (@prafulkpatel) April 19, 2021
कोरोना काल में दादरा नगर हवेली और दीव -दमन के नागरिकों के लाभ हेतु अब मरीजों को रेमडेसिवीर इंजेक्शन और ऑक्सीजन प्रशासन द्वारा मुफ्त दिया जाएगा। और लोगों का निजी अस्पतालों में भी इलाज किया जायेगा। ताकि मरीजों को बेहतर सुविधा मिल पाए। @PMOIndia pic.twitter.com/9gAbri4qwk
— Praful K Patel (@prafulkpatel) April 19, 2021
प्रशासक प्रफुल पटेल यांच्या आदेशानंतर आता या केंद्रशासित प्रदेशात आरोग्य विभागाने दादरा नगर हवेली आणि दमण-दीवमधील अनेक खासगी रुग्णालयांना कोरोनावरील उपचारांसाठी कोविड सेंटर बनवले आहे. एवढेच नाही, तर खासगी रुग्णालयांतील उपचारांचे दरही शासनाने निर्धारित केले आहेत.
येथील रुग्णालयांतील बेडच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील उपलब्ध बेडची सूचना डॅशबोर्डच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात येईल. खासगी आणि सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हिरची उपलब्धता, उपचारांची गुणवत्ता तसेच भारत सरकारच्या दिशानिर्देशांनुसार कोविड प्रोटोकॉलच्या निगराणीसाठी वरिष्ठ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासक प्रफुल पटेल यांच्या खासगी रुग्णालयांत कोविड उपचारांना मंजुरी आणि रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन मोफत उपलब्ध करण्याच्या आदेशानंतर नागरिकांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांतही कमी खर्चामध्ये कोरोनावरील उपचार घेणे शक्य झाले आहे.
Free remdesivir injection And Oxygen To All, Daman-Diu administrator Praful Patel made historic decision
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App