विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय जगतात भारताची ओळख आता संरक्षण क्षेत्रातला निर्यातदार अशी होत असताना फ्रान्स सारख्या विकसित राष्ट्राने भारताकडून संरक्षण सामग्री आयात करण्यात रस दाखविला आहे. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट गोष्ट ठरली आहे. फ्रान्ससारखा प्रगत देश आता भारतीय पिनाक रॉकेट सिस्टीम खरेदी करणार आहे. ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसाठी (DRDO) मोठी एक उपलब्धी ठरली आहे. मोदी सरकारच्या “मेक इन इंडिया” धोरणाचे हे यश ठरले आहे. pinak rocket system
पिनाक – भारतीय शक्तीचे प्रतिक
पिनाक हे नाव भगवान शंकराच्या धनुष्यावरून ठेवण्यात आले आहे. कारगिल युद्धात याचा प्रभावी वापर करण्यात आला होता आणि त्यानंतर ही प्रणाली अधिक सुधारित करण्यात आली.
फ्रान्सकडून पिनाका खरेदी – एक ऐतिहासिक क्षण!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सने पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर खरेदी करण्यास उत्सुकता दाखवली. फ्रान्ससारखा प्रगत देश भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर विश्वास दाखवत आहे, ही भारतीय संरक्षण उद्योगासाठी अभिमानास्पद ठरली.
– पिनाका रॉकेट सिस्टमची वैशिष्ट्ये :
– 75 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता – GPS मार्गदर्शन प्रणालीमुळे अचूक लक्ष्यभेद – 12 रॉकेट्स अवघ्या 44 सेकंदांत डागण्याची क्षमता – भारतीय बनावटीची स्वयंचलित प्रणाली – आत्मनिर्भर भारताची मोठी झेप!*
भारत आता केवळ संरक्षणसाहित्य खरेदी करणारा देश राहिला नाही, तर संरक्षण सामग्री निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत देखील प्रगती करत आहे. यामुळे भारताच्या संरक्षण उद्योगाला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळणार आहे.
भारत फ्रान्सकडून आजही संरक्षण सामग्री आयात करतो. राफेल विमाने हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, पण आता भारत फ्रान्स संरक्षण सहकार्य ही बाब फक्त फ्रान्सकडून आयातीपुरती मर्यादित उरलेली नसून आता फ्रान्स देखील भारताकडून शस्त्र खरेदी करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App