छत्तीसगडमध्ये आदिवसींच्या मतांचे समीकरण बदलणार, काँग्रेसचं टेंशन वाढलं
विशेष प्रतिनिधी
रायपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते अरविंद नेताम यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. आदिवासी समाजाच्या नेत्यांकडे पक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नेताम यांनी केला. तर नेताम यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, नेताम हे फार पूर्वीपासून पक्षविरोधी काम करत होते. Former union minister and senior tribal leader Arvind Netam quits Congress
काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर नेताम यांनी आरोप केला की, 2018च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांनी आदिवासींना पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा (PESA) लागू करण्याचे आश्वासन वारंवार दिले होते, परंतु त्यांचे सरकार पेसा कायद्याचे उल्लंघन करत आहे.
ज्येष्ठ आदिवासी नेते म्हणाले, “खूप विचार केल्यानंतर मी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनी राजीनामा दिला, कारण त्याच दिवशी राज्य सरकारने पेसा कायदा रद्द केला. जो समाजाला (आदिवासींना) ‘जल जंगल जमीन’चा अधिकार देते. हा राजीनामा म्हणजे एक प्रकारचा निषेधच आहे. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत.’’
अरविंद नेताम यांच्या नेतृत्वाखाली सर्व जाती समाजाने छत्तीसगड विधानसभेच्या 90 पैकी 50 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नेताम म्हणाले की आम्ही विधानसभेच्या ३० जागांवर आमचे उमेदवार थेट उभे करू, पण ज्या २० जागांवर आदिवासींचा मोठा प्रभाव आहे त्या जागांवरही लढू. या 20 जागांवर त्यांचा पक्ष इतर समाजातील उमेदवारांचेही स्वागत करेल, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more