जाणून घ्या, बेळगावमध्ये घडलेल्या घटनेत नेमकं काय घडलं?
विशेष प्रतिनिधी
Goa कर्नाटकातील बेळगावमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे गोव्याच्या एका माजी आमदाराला रिक्षा चालकाने मारहाण केली आणि घटनेनंतर काही वेळातच माजी आमदाराचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.Goa
संपूर्ण प्रकरण काय आहे?
गोव्याचे माजी आमदार लावू मामलेदार यांचा शनिवारी बेळगाव शहरात एका ऑटो चालकाशी झालेल्या भांडणानंतर मृत्यू झाला. भांडणानंतर मामलेदार हे त्यांच्या हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना, ते अचानक बेशुद्ध पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. ते ६९ वर्षांचे होते. या प्रकरणी आरोपी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
ही घटना दुपारी १:४५ वाजता खारे बाजारातील श्रीनिवास लॉजजवळ घडली. एका रिक्षा चालकाने लावू मामलेदार यांच्या कारला धक्का मारला, त्यानंतर त्यांचा ऑटो चालकाशी वाद झाला. वाद इतका वाढला की ऑटो चालकाने मामलेदारांवर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. या भांडणानंतर, मामलेदार त्यांच्या लॉजमध्ये प्रवेश करत असतानाच ते पायऱ्यांजवळच कोसळले.
खाडे बाजार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आणि डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळाला भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मामलेदार बेळगावला त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्त गेले होते. २०१२ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. यापूर्वी, मामलेदार गोवा पोलिसात डीएसपी दर्जाचे अधिकारी होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App