भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण दिग्विजयाच्या स्वप्नातील महत्वाचे पाऊल आज पडले. पुड्डुचेरीमध्ये प्रथमच भाजपाच्या दोन मंत्र्यांचां समावेश झाला आहे. भाजपाने प्रथमच येथे सत्ता मिळविली आहे.For the first time in Puducherry, there are two BJP ministers
विशेष प्रतिनिधी
पुड्डुचेरी : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण दिग्विजयाच्या स्वप्नातील महत्वाचे पाऊल आज पडले. पुड्डुचेरीमध्ये प्रथमच भाजपाच्या दोन मंत्र्यांचां समावेश झाला आहे. भाजपाने प्रथमच येथे सत्ता मिळविली आहे.
पुड्डुचेरीमध्ये दोन मे रोजी निवडणुकांचे निकाल लागले. मात्र, अद्याप कॅबीनेटमधील सर्व मंत्र्यांची नियुक्ती झाली नव्हती. याठिकाणी कॉँग्रेसला हरवून भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्टीय लोकशाही आघाडी सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी पदभार स्वीकारला आहे.
त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात पाच सदस्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये भाजपाचे दोन मंत्री आहेत. प्रथमच भाजपाला राज्याच्या सत्तेत भागिदारी मिळेले. मंत्रीमंडळात आॅल एनआर इंडिया कॉँग्रेसच्या चंदिरा प्रियंगा यांची नियक्ती झाली आहे. याठिकाणी ४१ वर्षांनंतर प्रथमच महिला मंत्री बनली आहे.
यापूर्वी कॉँग्रेसच्या रेणुका अप्पादुरई या मंत्री होत्या. याशिवाय ए नमस्सिवयम, के लक्ष्मीनारायणन, सी जेकौमर आणि एके साई जे सरवन कुमार यांचा मंत्रीमंडळात समावेश आहे. अद्याप मंत्रीमंडळाचे खातेवाटप झालेले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुड्डुचेरीमधील नवीन मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दृढ संकल्पाने नवीन मंत्री काम करून पुड्डुचेरीतील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App