काही मिनिटांच्या सुनावणीसाठी सुरत कोर्टासमोर राहुल – प्रियांका, तीन मुख्यमंत्री यांच्यासह काँग्रेसचे “भव्य” शक्तिप्रदर्शन!!


वृत्तसंस्था

सुरत : देशातल्या सर्व मुलींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची सजा सुनावली. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार त्यांची खासदारकी रद्द झाली. पण गांधी परिवारातल्या सदस्याची खासदारकी रद्द झाली, यामुळे राजकीयदृष्ट्या तापलेला विषय आज आणखी एकदा गुजरातच्या सुरत मध्ये तापला, किंबहुना उकळला!!For few minutes hearing of rahul Gandhi case Congress did huge show of strength in surat

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती मिळावी अथवा शिक्षा रद्द व्हावी यासाठी करण्यात आलेल्या सुरत सत्र न्यायालयातील फेरसुनावणीच्या वेळी काँग्रेसने स्वतः राहुल गांधी प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या तीन मुख्यमंत्र्यांसह सुरत कोर्टासमोर “भव्य” शक्तिप्रदर्शन करून घेतले.



राहुल गांधींना झालेली 2 वर्षांची सजा कमी करावी अथवा रद्द करावी अशा आशयाचा अर्ज राहुल गांधींच्या वकिलांनी सुरत सत्र न्यायालयात सादर केला होता. त्यावर सुनावणी घेण्यासाठी राहुल गांधींची हजेरी आवश्यक होती. त्यानुसार राहुल गांधी नवी दिल्लीहून सुरत मध्ये येऊन कोर्टात हजर राहिले. पण यावेळी त्यांनी त्यांच्या समावेत बहीण प्रियांका गांधी यांना आणले होते. त्याचवेळी काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री राजस्थानचे अशोक गहलोत, छत्तीसगडचे भूपेश बघेल आणि हिमाचल प्रदेशचे सुखविंदर सिंग सुख हे आपापली राज्ये सोडून सुरत मध्ये येऊन दाखल झाले होते. सुरत कोर्टासमोर त्यांच्यासह काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी करून मोठे शक्तिप्रदर्शन केले.

राहुल गांधींच्या केसची सुनावणी अक्षरशः काही मिनिटांची होती. पण त्यासाठी काँग्रेसने दिल्लीपासून विविध राज्यांमधल्या बड्या नेत्यांपर्यंत सगळ्यांची हजेरी सुरत कोर्टासमोर लावून घेतली. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश होता.

काही मिनिटांच्या सुनावणीसाठी एवढे भव्यशक्ती प्रदर्शन केल्याबद्दल काँग्रेस सोशल मीडिया ट्रोल देखील झाली. त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक नेते वेगवेगळ्या कोर्ट केसेस खाली तुरुंगात गेले होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी असा जमावडा का केला नव्हता??, असा सवाल अनेकांनी सोशल मीडियातून केला आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव केंद्रीय माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासारखे बडे नेते कोर्ट केसमुळे तुरुंगात गेले. त्यावेळी कोणत्या काँग्रेस नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी एवढे मोठे शक्तिप्रदर्शन त्यांच्या बाजूने केले नव्हते, असा टोला भाजप नेत्यांनी काँग्रेसला लागला आहे.

पण एवढे करूनही राहुल गांधी यांची सुरत कोर्टातली केसची सुनावणी आता 3 मे पर्यंत पुढे ढकलण्याची बातमी आली आहे. त्याचबरोबर राहुल गांधींचा जामीन 13 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी अधिकृत सूत्रांची बातमी आहे. म्हणजेच अक्षरशः काही मिनिटांच्या सुनावणीसाठी काँग्रेसने जबरदस्त ताकद लावून सुरत मध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करून घेतले हेच खरे!!

For few minutes hearing of rahul Gandhi case Congress did huge show of strength in surat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात