सावरकरांना भारतरत्न द्यायला काय मुहूर्त शोधताय का??; अजितदादांचा मोदी सरकारला खोचक सवाल


प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी केलेल्या अपमानाचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात अजून पेटलेलाच आहे. तो काही थांबायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केंद्रातल्या मोदी सरकारला हिंमत असेल, तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.Why don’t you give bharat ratna to Veer savarkar??; ajit Pawar pinched modi government

सावरकरांसारख्या महापुरुषांना भारतरत्न द्यायला काय मुहूर्त शोधताय का??, असा खोचक सवाल अजितदादांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. सावरकरच काय, पण असे अनेक महापुरुष आहेत, ज्यांना अद्याप भारतरत्न मिळालेला नाही. त्यांना देखील भारतरत्न द्यायला पाहिजे, असा टोलाही अजितदादांनी लगावला. आज शिंदे – फडणवीस सरकार सावरकर गौरव यात्रा काढत आहे. ही यात्रा काढायला हरकत नाही. पण ज्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांचा अपमान केला होता त्यावेळी ते का गप्प बसले होते??, असा सवालही अजितदादांनी केला.



आज केंद्रातह मोदी सरकार आहे. राज्यातही शिंदे – फडणवीस सरकार आहे म्हणजेच दोन्ही कडे तुमचेच सरकार आहे. मग सावरकरांना भारतरत्न द्यायला काय मुहूर्त शोधताय का??, असा खोचक सवाल अजितदादांनी केला आहे.

 डिग्रीचा वाद अनावश्यक

त्याच वेळी अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री संदर्भात विचारलेला प्रश्न टोलवून लावला आहे. अजितदादा म्हणाले, की 2014 मध्ये नरेंद्र मोदींना त्यांची डिग्री पाहून जनतेचे एवढा मोठा कौल दिला का?? काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कधी नव्हता एवढा मोठा भाजपचा करिष्मा नरेंद्र मोदींनी दाखवला. पूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणले. हे पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रेय आहे. ते काय त्यांच्या डिग्रीमुळे आले का??, असा खोचक सवाल करून अजितदादांनी एकाच वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना टोला हाणला. या देशात असे अनेक राजकीय नेते आहेत की ज्यांच्या डिग्री पेक्षा त्यांचे कर्तृत्व मोठे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
……..

पत्रकारांच्या सूचनेनुसार अजितदादा नागपुरात फडणवीसांविरुद्ध बोलणार

छत्रपती संभाजी नगरच्या वज्रमूठ सभेत अजितदादांच्या टीकेचा सगळा रोख केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध होता. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर बाळगून आहेत का??, असा सवाल एका पत्रकाराने या पत्रकार परिषदेत केला. त्यावर हसून उत्तर देताना अजितदादा म्हणाले, की तुमची सूचना मान्य आहे. पुढच्या नागपूरच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन मी बोलेन. तसेही नागपूर हे फडणवीसांचे होम ग्राउंड आहे. त्यामुळे ते भाषण हिट होईल. तुमची सूचना मी स्वीकारतो आणि त्या सभेत फडणवीसांचे नाव घेऊन बोलतो, अर्थात मला बोलायची संधी मिळाली तर, असे उत्तर देऊन अजितदादांनी पत्रकार परिषदेत हशा पिकवला.

Why don’t you give bharat ratna to Veer savarkar??; ajit Pawar pinched modi government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात