कोरोना नियम पाळा अन्यथा भारत जोडो यात्रा थांबवा; मनसुख मांडवियांच्या पत्रानंतर काँग्रेस नेते भडकले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आता पुन्हा एकदा संपूर्ण जगावर कोरोना या जीवघेण्या व्हायरसचे संकट घोंगावू लागले असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना नियम पाळायला सांगताच काँग्रेसचे नेते भडकले आहेत. Follow Corona rules otherwise stop Bharat Jodo Yatra

फक्त चीनच नव्हे तर जापान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्येदेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताने सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना प्रतिबंधक नियमावली पाळण्याचे अन्यथा यात्रा थांबविण्याचे आवाहन केले आहे. मात्र या पत्रामुळेच काँग्रेस नेत्यांनी भडकून भाजपवर आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप भारत जोडो यात्रेला घाबरल्यानेच यात्रा थांबविण्यासाठी पत्र लिहिल्याचा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.


Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत 117 नेते सहभागी होणार, कन्हैया कुमार आणि पवन खेरा यांचेही नाव यादीत


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे मांडविया यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना परवानगी द्यावी

मनसुख मांडवीया यांनी आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

Follow Corona rules otherwise stop Bharat Jodo Yatra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात