प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनसह ब्राझील, कोरिया, अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी भारतीयांनी जरूर काळजी घ्यावी. पण घाबरून जाऊ नये. भारतीयांची हायब्रीड इम्युनिटी मजबूत आहे, असे प्रतिपादन कोरोना राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉक्टर एन. के. अरोरा यांनी केले आहे. Corona outbreak in China is no reason to panic, Indians have strong hybrid immunity
चीनसह अन्य देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट वर आले आहे. देशभरातल्या शाळा, महाविद्यालयांना आणि सार्वजनिक ठिकाणांच्या व्यवस्थांना कोरोना नियमावली पाळण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. एन. के. अरोरा यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीत भारताने काय केले पाहिजे?, याचे सविस्तर विवेचन केले.
नवीन व्हेरिएंटची भीती निर्माण झाली आहे का? आपल्याला काही चिंता करण्याची गरज आहे का? या प्रश्नावर अरोरा म्हणाले, की भारताने चिंता करण्याची गरज नाही. गोष्टी अगदी सुस्थितीत आहेत. आपल्या देशातील लोकांना लसीकरणाच्या माध्यमातून सुरक्षित करण्यात आले आहे. आपल्यापैकी अनेकांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नैसर्गिकपणे या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असल्याने आपल्यातील हायब्रिट इम्युनिटी (नैसर्गिकरित्या निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती) उत्तम आहे. ओमायक्रॉनचा आपण यशस्वीपणे सामना केला आहे. आपल्याकडे त्यावेळेस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही, याची आठवणही डॉ. अरोरा यांनी करून दिली.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक, पण भारतात स्थिती नियंत्रणात; डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास
भारतीयांना संसर्गाचा त्रास नाही
2022 मार्च – एप्रिलमध्ये आपल्याकडे रुग्णसंख्या वाढली होती. मात्र आता आपल्याकडे रुग्णसंख्या 2020 नंतर सर्वात कमी स्तरावर आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जिनोम सिक्वेन्सिंगचा आहे. 2022च्या शेवटापर्यंत याकडेच लक्ष देण्यात आले आहे. जगभरामध्ये ज्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत ते आपल्याकडेही आढळून आले आहेत. मात्र भारतीयांना या संसर्गाचा फार त्रास झाला किंवा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं दिसून आलं नाही, असे निरिक्षण अरोरा यांनी नोंदविले आहे.
सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहेत
आपण याच मार्गाने वाटचाल करणे आवश्यक आहे. मात्र जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात अधिक सतर्क होऊन काम करावे लागणार आहे. त्यामुळे एखादा वेगाने पसरणारा आणि जास्त घातक नवीन व्हेरिएंट आला तर त्याची माहिती लवकर मिळू शकते. सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे अरोरा म्हणाले.
मोठा गोंधळ निर्माण झाला नाही
केंद्राने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आता जिनोम सिक्वेन्सिंगची पद्धत बदलली जाणार आहे का?, यावर अरोरा म्हणाले, नाही असे काही होणार नाही. मी या जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात निर्णय घेणाऱ्या गटाच्या संपर्कात आहे. नव्या व्हेरिएंटमुळे मागील वर्षाप्रमाणे मोठा गोंधळ निर्माण झालेला नाही. मात्र, आता आपली जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भातील यंत्रणा फारच सतर्क, सक्रीय असणे गरजेचे आहे.
उद्या महत्त्वाची बैठक
आपण डॅशबोर्ड तयार केला असून त्यावर दर आठवड्याची आकडेवारी पाहता येते. बीए-४, बीए-५ सारख्या व्हेरिएंटमुळे उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचा भारतात प्रसार झाला नाही. जास्तीत जास्त रुग्ण हे बीएक्सएस आणि बी-२७५ या व्हेरिएंटचे जास्त रुग्ण या घडीला भारतात आहेत. यंत्रणा कार्यरत आहेत. बऱ्याच गोष्टी आपण आधीच केलेल्या आहेत. उद्या आमची बैठक आहे. त्यात काय होईल हे समोर येईलच, असे अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App