महाराष्ट्रात डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या 4500 जागांची भरती; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनांची विधानसभेत माहिती

प्रतिनिधी

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या 4500 जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. Recruitment of 4500 posts of doctors, technicians in Maharashtra

सध्या 28 % पदे रिक्त

अधिवेशनात गिरीश महाजन म्हणाले, आम्ही एमपीएसच्या माध्यमातून 300 डाॅक्टर भरले आहेत. सध्या 28 % पदे रिक्त आहेत यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमपीएससी मार्फत जागा भरण्यास वेळ लागतोय महाजन पुढे म्हणाले, आतापर्यंत 10 % हाॅस्पिटल आणि 90 % हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 % हाॅस्पिटल आणि 70 % हाफकिन अशी औषध खरेदी केली जाईल.



2024 पर्यंत JJ सुपर स्पेशालिस्ट हाॅस्पिटल

नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायचे म्हटले तरी ते शक्य होत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. म्हणून जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येतील, असे महाजन म्हणाले. 2024 पर्यंत जे. जे. सुपर स्पेशालिस्ट हाॅस्पिटल करत आहोत. तसेच, रिचर्ड अॅंड क्रुडास येथील जागा जी 99 वर्षांच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत 20 वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा जेजे ला मिळाली तर मोठा फायदा होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल, असे महाजन म्हणाले.

Recruitment of 4500 posts of doctors, technicians in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात