चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक, पण भारतात स्थिती नियंत्रणात; डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पुन्हा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. चीनने मध्यंतरी लॉकडाऊन सारख्या उपाययोजना करूनही चीनला कोरोना नियंत्रणात यश आलेले नाही. कारण चिनी व्हॅक्सिन कोरोनावर निष्प्रभावी ठरले आहे. Huge outbreak of Corona again in China

परंतु भारतात तशी स्थिती येणार नाही. कारण भारतातली कोरोना व्हॅक्सिन्स अधिक प्रभावी आहेत आणि ते अल्फा डेल्टा ओ मायक्रोन यासारख्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर यशस्वीरित्या काम करत आहेत, असा विश्वास अखिल भारतीय आयुर्वेद विज्ञान संस्था एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय परिस्थितीचा डॉ. गुलेरिया यांनी आढावा घेतला आहे. डॉ. गुलेरिया सध्या मेदांता हॉस्पिटलचे संचालक आहेत.

चीनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती तिथल्या सरकारने व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या आहेत. तिथे कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचे ढिगारे अस्ताव्यस्त पडल्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर फिरत आहेत.

चीनच्या शी जिनपिंग सरकारने झिरो कोविड पॉलिसी अमलात आणली आहे. पण त्या पॉलिसीचा उपद्रव चिनी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होतो आहे. चीनमध्ये एकीकडे सरकार विरुद्ध प्रचंड असंतोषाची लाट आणि दुसरीकडे कोरोनाची तिसरी लाट या कात्रीत तिथले सरकार आणि जनता सापडली आहे.

मात्र भारतात कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटसाठी भारतीय भूमीत उत्पादन झालेली सगळी व्हॅक्सिन उपचारात यशस्वी ठरली आहेत. त्यामुळे भारतात चीन सारखे परिस्थिती उद्भवणार नाही, असा विश्वास डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.

Huge outbreak of Corona again in China

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात