विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – लशींचे समान वितरण हा जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा मार्ग आहे, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘जी-२०’ देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत मांडली. FM Nirmala Sitharaman bats for vaccine distribution
यावेळी सीतारामन म्हणाल्या की,‘जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व देशांनी सहकार्य आणि उत्पादन वाढवितानाच अनेक सुधारणा घडवून आणणेही आवश्य क आहे. हेच सर्व देशांचे लक्ष्य असायला हवे. तसेच, सर्वांनाच समान प्रमाणात लस उपलब्ध होणे, हे देखील अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आवश्यपक आहे.
कोरोना काळात जी-२० गटाने अनेक देशांना मदतीचा हात दिला असून ही मदत योग्य त्या ठिकाणी पोहोचेल, यासाठीही प्रयत्न करायला हवेत.’ आर्थिक संकटात असलेल्या देशांना दिलेले पाठबळ अचानक काढून न घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
इटलीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आरोग्य क्षेत्रातील सुधारणा, पर्यावरण बदल, आंतरराष्ट्रीय करव्यवस्था, वित्त क्षेत्रासमोरील समस्या या मुद्द्यांवरही चर्चा झाली. पर्यावरण बदलाबाबत समोर ठेवलेली उद्दीष्टे साध्य करण्यात अनेकांना अपयश आल्यानेच या समस्येला तोंड देणे अवघड होत असल्याचे सीतारामन यांनी निदर्शनास आणून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App