75 टक्के देश अतिवृष्टीच्या विळख्यात आहे.
विशेष प्रतिनिधी
काठमांडू : नेपाळमध्ये ( Nepal ) हवामानाचा तडाखा कायम आहे. अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाशी झुंज देत आहे. नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत 112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 64 जण बेपत्ता आहेत. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
नेपाळी सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, कावरेपालन चौकात एकूण 34 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय ललितपूरमध्ये 20, धाडिंगमध्ये 15, राजधानी काठमांडूमध्ये 12, मकवानपूरमध्ये सात, सिंधुपालचौकमध्ये चार, दोलखामध्ये तीन आणि पाचथर आणि भक्तपूर जिल्ह्यात प्रत्येकी पाच मृतदेह सापडले आहेत. धनकुटा आणि सोलुखुंबू येथे प्रत्येकी दोन, महोतारी आणि सुनसरी जिल्ह्यात प्रत्येकी एक मृतदेह सापडला.
नेपाळचे गृहमंत्री रमेश ललकर यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे काठमांडू खोऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे.
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शनिवारी 24 तासांत 323 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या ५४ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस होता. नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन मॅनेजमेंट अथॉरिटीने ७७ पैकी ५६ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
सुमारे चार लाख लोकांना पूर आणि पावसाचा फटका बसण्याची भीती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 13 जूनच्या सुमारास मान्सून नेपाळमध्ये येतो आणि सप्टेंबरच्या अखेरीस परत जातो. मात्र यावेळी नेपाळमध्ये मान्सून ऑक्टोबरपर्यंत टिकू शकतो. नेपाळच्या हवामान कार्यालयाने सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत 1,586.3 मिमी पाऊस पडला होता. गेल्या वर्षी 1,303 मिमी पावसाची नोंद झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App