मच्छीमारांच्या वारसांना तब्बल चार कोटींची भरपाई, इटलीच्या नौसैनिकांवरील खटला अखेर बंद


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केरळमधील मच्छीमारांची २०१२मध्ये हत्या प्रकरणातील इटलीच्या दोन नौसैनिकांवर भारतात सुरू असलेला फौजदारी खटला बंद करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शविली. या दोघांवरील पुढील खटला इटली सरकार चालविणार असल्याचेही सांगण्यात आले. पीडित मच्छीमारांच्या वारसांना भरपाई म्हणून दहा कोटी रुपये जमा केल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने खंडपीठाला दिली. Fisherman gets 4 cr. compensaion



दहा कोटींपैकी दोन्ही मच्छीमारांच्या वारसांना प्रत्येकी चार कोटी रुपये तर संबंधित मासेमारी नौकेच्या मालकाला दोन कोटी रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने याआधी दिले होते. लक्षद्विपजवळ मासेमारीसाठी गेलेली सेंट अँटोनी ही नौका १५ फेब्रुवारी २०१२मध्ये परतत असताना ‘एनरिका लेक्झी’ या इटलीच्या तेलवाहू जहाजावरील साल्वादोर गिरोन आणि मासिमिलियानो लॅतोर या नौदल कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला. यानंतर लगेचच भारतीय तट रक्षक दलाने इटलीचे जहाज ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली. नुकसानभरपाईची पूर्ण रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खटला निकाली काढू नये, अशी विनंती पीडितांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती.

Fisherman gets 4 cr. compensaion

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात