Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभेचे आजपासून पहिले अधिवेशन; अब्दुल रहीम राथेर यांची अध्यक्षपदी निवड होणार

Jammu and Kashmir

वृत्तसंस्था

श्रीनगर : Jammu and Kashmir  जम्मू-काश्मीर विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी रविवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ आमदार अब्दुल रहीम राथेर यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित करण्यात आले.Jammu and Kashmir

राथेर हे सातव्यांदा आमदार झाले आहेत आणि केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या विधानसभेतील ते सर्वात वयस्कर आमदार आहेत. या बैठकीला काँग्रेस, माकप, आम आदमी पक्ष आणि अपक्ष आमदारांनी हजेरी लावली होती.



अधिवेशनापूर्वी सभापतींची निवड होणार

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. यानंतर उपराज्यपालांचे भाषण होईल.

उपसभापतीपद भाजपला मिळू शकते

अब्दुल्ला सरकार भाजपला उपसभापती पद देऊ शकते. मात्र, अद्याप यासंबंधीची कोणतीही माहिती सरकारकडून भाजपला देण्यात आलेली नाही. आज होणाऱ्या बैठकीत यावरही निर्णय होऊ शकतो. रविवारी झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत सुनील शर्मा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील. तर सत शर्मा यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्यांबाबत अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात 6 दहशतवादी हल्ले झाले आहेत. लष्कर कमांडरसह सहा दहशतवादी ठार झाले आहेत. 3 जवानही शहीद झाले. याशिवाय 8 बिगर काश्मिरी मजुरांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरींना लक्ष्य करून अनेक हल्ले केले आहेत.

ओमर अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांबाबत दिलेल्या वक्तव्याबाबतही अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. वास्तविक फारुख म्हणाले होते की सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार करू नका, तर त्यांना अटक करा. यावरून भाजपने फारुख यांना लक्ष्य केले होते.

First session of Jammu and Kashmir Legislative Assembly from today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात