वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातची निवडणूक कोणत्याही स्थितीत मोदींवर जाता कामा नये असा चंग बांधलेल्या काँग्रेसने अखेर आपल्याच करणीतून निवडणूक पुन्हा चहावरच आणली आणि मोदींना पाहिजे तसेच घडले. First round of Gujarat campaign ends; The election came back to tea
त्याचे घडले असे : अहमदाबादच्या प्रचार सभेत भाषणाच्या ओघात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चहाच्या व्यवसायाचा उल्लेख केला. तुम्ही लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी गरीब चहावाले असल्याचे पंतप्रधान भासवता, अशी टीका करताना मल्लिकार्जुन खर्गे वेगळ्याच दिशेला गेले. मोदींना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही गरीब चहावाले असाल. पण किमान तुमचा चहा प्यायला तरी लोक येतात. पण मी अशा अस्पृश्य समाजातून येतो, ज्याचा चहाही प्यायला लोक येत नाहीत. खर्गे यांनी भाषणाच्या ओघात हे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आणि भाजपच्या नेत्यांना मल्लिकार्जुन खरे यांना उत्तर देण्याची संधी मिळाली.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी खर्गे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांना खोचक टोला लगावला. हेमंत विश्वशर्मा म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात ते खरेच आहे. त्यांच्याबरोबर आत्तापर्यंत राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांनी चहा प्यायला नसेल. त्यामुळे आता राहुल गांधींची ही जबाबदारी आहे की त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर चहा पीत असल्याचा फोटो ट्विट करावा.
खड़गे जी बोल रहे हैं कि कोई उनके साथ चाय नहीं पीता है। हो सकता है कि राहुल जी अब तक उनके साथ चाय नहीं पीते। खड़गे जी के इस बयान पर राहुल जी को एक ट्वीट करना चाहिए जिसमें वे खड़गे जी के साथ चाय पी रहे हों। ये बहुत जरूरी है: असम के मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, अहमदाबाद https://t.co/EzRgx55ywI pic.twitter.com/aYsTCDKRsY — ANI_HindiNews (@AHindinews) November 29, 2022
खड़गे जी बोल रहे हैं कि कोई उनके साथ चाय नहीं पीता है। हो सकता है कि राहुल जी अब तक उनके साथ चाय नहीं पीते। खड़गे जी के इस बयान पर राहुल जी को एक ट्वीट करना चाहिए जिसमें वे खड़गे जी के साथ चाय पी रहे हों। ये बहुत जरूरी है: असम के मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, अहमदाबाद https://t.co/EzRgx55ywI pic.twitter.com/aYsTCDKRsY
— ANI_HindiNews (@AHindinews) November 29, 2022
गुजरात विधानसभेची निवडणूक कोणत्याही स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती केंद्रित होऊ नये म्हणून काँग्रेसच्या नेते खूप काळजी घेऊन प्रचार करत होते. राहुल गांधी तर गुजरातच्या प्रचाराकडे एखाद दुसरा अपवाद वगळता फिरकलेही नाहीत. त्यामुळे त्यांना घेरण्याची संधी मोदींना मिळाली नाही. पण नेमके प्रचार संपायच्या दोन दिवस आधी मल्लिकार्जुन खर्गे हे चहाचा विषय काढून बसले आणि निवडणूक पहिल्या टप्प्यात तरी पुन्हा मोदींभोवतीच फिरायला लागली आणि भाजपच्या नेत्यांना किंबहुना मोदींना हवी तशी काँग्रेसला ठोकण्याची संधी मिळाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App