आधी सावरकर आणि आता राजे – राजवाडे यांचा राहुल गांधींकडून अपमान; पण 1857 पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वांचेच मोलाचे योगदान!!

नाशिक : राहुल गांधींचे भाषण आणि त्यातून त्यांनी कुठले वादग्रस्त वक्तव्य केले नाही, असे कधी घडतच नाही. राहुल गांधींनी आधी आपल्या भाषणांमधून आणि पत्रकार परिषदांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला आणि आज नागपूर मधल्या भाषणातून हिंदुस्थानातल्या राजे राजवाड्यांचा देखील अपमान केला. First rahul Gandhi Gandhi insulted savarkar and now great freedom fighters of 1857 to 1947

काँग्रेस जेव्हा स्वातंत्र्यलढ्यात उतरून ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होती, त्यावेळी या देशातले राजे – राजवाडे ब्रिटिशांबरोबर पार्टनरशिप करत होते. ब्रिटिशांविरुद्धची लढाई काँग्रेसने लढली. पण राजे राजवाड्यांनी ब्रिटिशांना मदत केली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. हा धादांत खोटा आरोप करूनच राहुल गांधींनी देशातल्या स्वातंत्र्यलढ्यात 1857 पासून ते 1947 पर्यंत अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक राजे – राजवाड्यांचा अपमान केला.

 1857 चे स्वातंत्र्यसमर

1857 च्या स्वातंत्र्यसमरात नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, महाराजा कुवरसिंह, दिल्लीचा बादशहा बहादुर शाह जफर, सेनापती तात्या टोपे हे वीर योद्धे लढले. हे सगळे राजे – राजवाडेच होते. ब्रिटिशांची पार्टनरशिप करून ते आपापल्या संस्थानांपुरते सुख निश्चित उपभोग घेऊ शकले असते. परंतु त्या सुखावर या राजे – राजवाड्यांनी लाथ मारली आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी ते प्रत्यक्ष रण मैदानात उतरले होते.

नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई महाराजा कुवरसिंह, दिल्लीचा बादशहा बहादुर शाह जफर, सेनापती तात्या टोपे या सगळ्यांना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांची राजगादी तर गेलीच, पण परागंदा होऊन प्राण गमवावी लागण्याची वेळ त्यांच्यावर आली पण यापैकी कोणीही ब्रिटिशांकडे अखेरपर्यंत झुकले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्यसमोर या आपल्या महान ग्रंथातून वर उल्लेख केलेल्या सर्व राजे राजवाड्यांसह अनेक महान वीरांचा परामर्श घेतला आहे, पण राहुल गांधी हा इतिहास आज पूर्ण विसरले.

शाहू महाराज, सयाजीराव महाराज, सिंधिया महाराज यांचे महान योगदान

1857 नंतर देखील एकोणिसाव्या शतकात त्यानंतर बडोद्याचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड, ग्वाल्हेरचे संस्थानिक महाराजा जिवाजीराव शिंदे तसेच कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी देखील हस्ते पर हस्ते देशातल्या स्वातंत्र्य लढ्याला आणि त्यावेळच्या स्वातंत्र्यसैनिकांना फार मोलाची मदत केली होती.

सयाजीराव गायकवाड यांनी लोकमान्य टिळकांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांना फार मोठी मदत केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनेक क्रांतिकारक सहकारी बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांचे अधिकारी आणि कर्मचारी म्हणून निवास करून राहिले होते.

राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे सामाजिक मुद्द्यांवर मतभेद असले तरी, स्वातंत्र्यलढ्याच्या मुद्द्यावर बिलकुल मतभेद नव्हते. उलट लोकमान्य देशासाठी लढत असताना आपण त्यांना मदतच केली पाहिजे. त्यांच्या विरोधात ब्रिटिशांना मदत करताच कामा नये, अशी आग्रही भूमिका शाहू महाराजांनी घेतल्याचे ऐतिहासिक पुरावे या दोन्ही नेत्यांच्या चरित्रांमध्ये आढळतात.

महाराजा जिवाजीराव सिंधिया यांनी देशात हिंदूंचे सैनिकीकरण व्हावे यासाठी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलला शेकडो एकर जमीन देऊन मोठी आर्थिक मदत केली होती.

अनेक संस्थानिकांनी आपापल्या संस्थानांमध्ये देशातल्या क्रांतिकारकांना आश्रय देऊन त्यांचे प्राण वाचविल्याची देखील असंख्य उदाहरणे राजे – राजवाड्यांच्या इतिहासात सापडतात. हे राजे राजवाडे फक्त हिंदुस्थानच्या एका विभागापूर्वी मर्यादित नव्हते, तर सगळ्या हिंदुस्थानवर पसरलेल्या वेगवेगळ्या संस्थानिकांनी हस्ते परहस्ते देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान दिलेच होते.

परंतु काँग्रेसचे गादीनशीन युवराज राहुल गांधी राजे राजवाड्यांचे हे सगळे योगदान एका झटक्यात विसरले आणि त्यांनी जसा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान योगदानाचा अपमान केला होता, तसाच त्यांनी नागपूरच्या भाषणात राजे राजवाड्यांचा अपमान केला.

First rahul Gandhi Gandhi insulted savarkar and now great freedom fighters of 1857 to 1947

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात