मध्य प्रदेशातील हरदामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

या भीषण दुर्घटनेत तब्बल 60 पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

हरदा: मध्य प्रदेशातील हरदा शहरात मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले. कारखान्यात आणि आजूबाजूलाही अनेकजण अडकल्याची शक्यता आहे.Firecrackers factory fire in Madhya Pradeshs Harda 6 dead

या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये घटनास्थळी अधूनमधून स्फोटांसह उंच ज्वाळा दिसत आहेत आणि लोक स्वतःला वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत.



एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून घटनेची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्री उदय प्रताप सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव अजित केसरी आणि होमगार्डचे महासंचालक अरविंद कुमार यांना हेलिकॉप्टरने हरदा येथे पोहोचण्याचे निर्देश दिले.

अधिकाऱ्याने सांगितले की, इंदूर, भोपाळ येथील रुग्णालये आणि राज्याच्या राजधानीत असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंदूर आणि भोपाळ येथून अग्निशमन दलाच्या गाड्याही पाठवण्यात आल्या होत्या. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकही बोलावल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Firecrackers factory fire in Madhya Pradeshs Harda 6 dead

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात