विशेष प्रतिनिधी
मुंबई – डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधांची बेकायदा ऑनलाईन विक्री, तसेच विक्रीस होकार दर्शवल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ॲमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीला नोटीस बजावली आहे.FDA issues notice to Amazon and Flip cart
गर्भपाताच्या औषधांची बेकायदा विक्री थांबवण्यासाठी प्रशासनाने एकूण ३४ संकेतस्थळांची पडताळणी केली. त्यानुसार अॅमेझॉनवर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदवली.
डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन दिले नसतानाही ॲमेझॉनने दोन वेळा औषधांची मागणी स्वीकारून त्यांचा पुरवठा केला. लखनऊमधील गुरुनानक इंटरप्राइजेस व ओरिसातील चौधरी फार्मास्युटिकल्स/पिरामल कंपनीकडून ही औषधी पुरवण्यात आली होती.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय एमटीपी किटची विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. त्यानुसार प्रशासनाने अॅमेझॉन व संबंधित वितरकांना नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
फ्लिपकार्टनेदेखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता दोन वेळा औषधांची ऑर्डर स्वीकारत एसएमएसद्वारे ती औषधे पुरवणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा औषधांच्या विक्रीस होकार दर्शवणे हे देखील कायद्याचे उल्लंघन ठरते, अशी नोटीस फ्लिपकार्टला बजावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App