गाझीपूरमध्ये भीषण अपघात, हाय टेन्शन लाईन तुटून प्रवाशांनी भरलेली बस पेटली, 10 जणांचा मृत्यू

अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. Fatal accident in Ghazipur bus full of passengers caught fire after high tension line broke 10 people died

विशेष प्रतिनिधी

गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. येथे प्रवाशांनी भरलेल्या बसवर हाय टेन्शन लाईन पडल्याने मोठा अपघात झाला. एचटी लाईन घसरल्याने बसला भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच बसमध्ये आरडाओरडा झाला. काही वेळाने बस पेटू लागली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. ही घटना गाझीपूरच्या मर्दाह पोलीस स्टेशन परिसरातील महाहर धामजवळ असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर लगेचच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्यात सहभागी होण्याचे निर्देश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसमध्ये हा अपघात झाला त्यात वऱ्हाडी प्रवास करत होते. मात्र, ही बस कुठून येत होती आणि कुठे जात होती, याची माहिती मिळू शकली नाही. बसमध्ये सुमारे 50 लोक होते. माहिती देताना डीआयजी वाराणसी ओपी सिंह म्हणाले की, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Fatal accident in Ghazipur bus full of passengers caught fire after high tension line broke 10 people died

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात