वृत्तसंस्था
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कोळसा खाणी वितरण घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेले काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याच वेळी याच प्रकरणात अडकलेल्या बाकीच्या तीन आरोपींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. Ex-MP Vijay Darda, son Devendra sentenced to 4 years in jail in coal block allocation case
लोकमत समूहाचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या 3 आरोपींना छत्तीसगड कोळसा खाणी वाटप प्रकरणात घोटाळा केल्याबद्दल प्रत्येकी 4 वर्षांची शिक्षा तुरुंगवासाची शिक्षा दिल्लीतील विशेष न्यायालयाने सुनावली.
त्याचबरोबर माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. कोफ्रा आणि के. सी. सामरिया यांना या घोटाळ्यात मुख्य आरोपींना मदत केल्याबद्दल प्रत्येकी 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
छत्तीसगडमध्ये कोळसा खाणीचे हक्क मिळवण्यात विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोज कुमार जयस्वाल यांनी अनियमित्ता केली. हे आरोप त्यांच्यावर दिल्ली न्यायालयात सिद्ध झाले. या तिघांनाही दिल्ली न्यायालयाने आधीच दोषी ठरविले होते. या सर्वांना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. या सर्व दोषींना या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा हक्क अबाधित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App