वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) मुरलीधर यांना कॉल आणि व्हॉट्सअॅप मेसेज करून धमकी दिली आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली.Death threats to 6 judges of Karnataka High Court; Demand to deposit 50 lakhs in Pakistani account
फोन करणार्याने पाकिस्तानी बँक एबीएल अलाईड बँक लिमिटेडचा खाते क्रमांकही दिला आणि पैसे जमा न केल्यास दुबईची गँग न्यायाधीशांची हत्या करेल असे सांगितले. हे भारतीय शूटर्स आमचेच आहेत, असे म्हणत कॉलरने पीआरओसोबत काही क्रमांकही शेअर केले.
हिंदी, उर्दू आणि इंग्रजीमध्ये संदेश पाठवला
न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, एचटी नरेंद्र प्रसाद, अशोक निजगन्नावार, के नटराजन आणि वीरप्पा अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत.
पीआरओने सांगितले की, 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता फोन आला होता. धमकीचा संदेश हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता. पीआरओने याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांना एक दिवसापूर्वी धमकीचा फोन
रविवारी (23 जुलै) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला की, आरडीएक्स आणि दोन पाकिस्तानी नागरिकांसह एक टँकर गोव्याकडे रवाना झाला आहे. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख पांडे अशी सांगितली. पोलिसांनी त्याच दिवशी कॉलचे लोकेशन शोधून कॉलरचा शोध सुरू केला होता. आत्तापर्यंत या प्रकरणात नवीन अपडेट आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App