स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपा सोडल्यानंतरही पुत्राचा “वेगळा” खुलासा; भाजपशी तडजोडीच्या हालचाली!!


वृत्तसंस्था

कुशीनगर : उत्तर प्रदेशातील मोठे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून मंत्री पदाचा राजीनामा देऊन भाजपा सोडल्यानंतर देखील त्यांचे पुत्र उत्कर्षित मौर्य अशोक एक वेगळाच खुलासा केला हा आहे. Even today, there is no such issue that my father wants a ticket for me or my sister

माझ्या वडिलांनी माझ्यासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मागितले आहे. आता हे माझ्या वडिलांनी आणि पक्षाने ठरवायचे आहे की मी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवायची की सामान्य कार्यकर्त्या प्रमाणे निवडणुकीत काम करायचे? स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडला असला तरी आजही आमच्या दृष्टीने तो फार मोठा विषय नाही.

माझ्या वडिलांनी पक्षाकडे माझ्यासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी मागितले आहे. आमच्या दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळाले तर आम्ही भाजपच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवू शकतो, असे उत्कर्षित मौर्य अशोक यांनी स्पष्ट केले.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी स्वतः पक्ष सोडला असला तरी त्यांची कन्या खासदार संघप्रिया आणि पुत्र उत्कर्षित मौर्य अशोक या दोघांची राजकीय भवितव्यासाठी ते पुन्हा भाजपशी तडजोड करून पक्षात येऊ शकतात, अशा प्रकारच्या हालचाली स्वामी प्रसाद मौर्य यांच्याच घरातून सुरू झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Even today, there is no such issue that my father wants a ticket for me or my sister

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*