विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. चार्ल्स मिशेल यांनी ट्विट केले की, निर्दोष नागरिकांवरील रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे खार्किवमध्ये भारतीय विद्याथ्यार्चा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो.European Council President discusses with Prime Minister Modi, expresses grief over death of Indian student
रशियानं युक्रेनवर हल्ला करून आता सहा दिवस उलटले आहेत. जगभरातल्या देशांनी वारंवार आवाहनं करून देखील आणि निर्बंध टाकून देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन युद्धात माघार घ्यायला किंवा युद्ध थांबवायला तयार नाहीत.
त्यामुळे आता हे युद्ध अटीतटीचं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियानं आपलं सैन्य मोठ्या प्रमाणावर युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेनं वळवलं आहे. किव्हमधल्या अनेक ठिकाणांवर रशियाकडून रॉकेट्सने देखील हल्ले करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत असून रशियाला आवर घालण्यासाठी सर्व तºहेचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App