मारले गेलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दोन ठिकाणी शनिवारी सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. या चकमकीत आतापर्यंत चार दहशतवादी ठार झाले असून दोन जवानही शहीद झाले आहेत. शनिवारी दुपारी दहशतवादविरोधी मोहीम सुरू झाली. पहिली चकमक कुलगामच्या मुद्राघममध्ये आणि दुसरी चकमक फ्रिसल चिन्निगाम भागात सुरू झाली. मारले गेलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.Encounter started at two places in Kulgam so far four terrorists have been killed and two jawans have been martyred
या चकमकींबाबत, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सांगितले की, या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक (IGP), विधि कुमार बिर्डी म्हणाले, “फ्रिसाल चिन्निगाममध्ये चार दहशतवादी ठार झाले आहेत, त्यांचे मृतदेह घटनास्थळी दिसले आहेत. दुसऱ्या बाजूने जोरदार गोळीबार झाल्याने आम्ही मृतदेह बाहेर काढले नाहीत, दहशतवाद्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आले.”
काश्मीर पोलीस प्रमुख म्हणाले की, ऑपरेशनच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. ते म्हणाले, ऑपरेशन संपल्यानंतर दहशतवाद्यांची ओळख पटवली जाईल. हे ऑपरेशन महत्त्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफने परिसराला वेढा घातला. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली चकमक कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम गावात सुरू झाली. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, या चकमकीनंतर दीड तासानंतर फ्रिसल चिन्निगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जिथे आतापर्यंत चार दहशतवादी मारले गेले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App