वृत्तसंस्था
भोपाळ : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चार्टर्ड विमानाचे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. या विमानाने सोनिया-राहुल बंगळुरूहून दिल्लीला जात होते. भोपाळ विमानतळावर सुमारे दीड तास थांबल्यानंतर दोघेही रात्री 9.35 वाजता इंडिगोच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.Emergency landing of Sonia-Rahul’s flight in Bhopal; Tantric breakdown from Bangalore, left for Delhi
राहुल-सोनिया भोपाळ विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये थांबले होते. यादरम्यान भोपाळचे काँग्रेस नेते तेथे पोहोचले आणि त्यांची भेट घेतली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, काँग्रेसचे आमदार पीसी शर्मा, कुणाल चौधरी, आरिफ मसूद आणि शोभा ओझा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते विमानतळावर पोहोचले.
विरोधी आघाडीचे नाव ठरले:INDIA चा फुल फॉर्म खरगेंनी सांगितला, पुढची बैठक मुंबईत, तिथेच 11 जणांची समन्वय समिती ठरणार
बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या दुसऱ्या दिवशीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी विरोधी आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आल्याचे सांगितले. या नावाचा फुल फॉर्मही त्यांनी सांगितला. त्यांच्यानुसार याचा फुल फॉर्म “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स” असा आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले- समन्वयासाठी 11 सदस्यांची एक समिती आणि एक कार्यालय लवकरच स्थापित केले जाईल. मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत याची घोषणा केली जाईल असे खरगे म्हणाले.
विरोधी ऐक्य:”एकत्र लढू आणि जिंकू”; बैठकीत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांचे ट्विट, नेत्यांसोबतचे फोटोही टाकले
बंगळुरूत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. विरोधी पक्षांच्या ऐक्यासोबत जागावाटप आणि आघाडीच्या नावाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान या बैठकीला हजर राहिल्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more