वृत्तसंस्था
बांधवगड : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींसाठी खास गज महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात त्यांचे लाड केले जात असून आवडते खाद्यपदार्थही दिले जात आहेत. Elephant festival begins in Bandhawgadh
गज महोत्सवाबद्दल बोलताना माहूत म्हणाले, की वर्षभर येथील हत्ती वाघांचा शोध घेणे व जंगलाशी संबंधित इतर कामे करण्यात व्यग्र असतात. मात्र, आठवडाभर हत्तींना या दिनक्रमातून ब्रेक दिला असून त्यातून त्यांना नवीन जोम, ऊर्जा मिळेल. या काळात हत्तींना तेलाने मसाज केला जात असून स्नान घातल्यानंतर त्यांना सजविले जात आहे. त्यांना केळी, सफरचंद, ऊसासारखे आवडीचे खाद्यही दिले जात आहे. सुट्टीचा आनंद घेणारे हत्ती पाहण्यासाठी पर्यटकांना बांधवगडमधील ताला येथील शिबीराला भेट देता येईल.
एरवी या हत्तींकडून अभयारण्यात वाघांचा शोध घेण्यासह इतर कामे करून घेतली जातात. मात्र या काळात हत्तींना नेहमीच्या कष्टप्रद जीवनातून काहीसा आराम देण्याचा या महोत्सवाचा हेतू आहे. या काळात हत्तींना स्नान घातले जाईल. त्याचप्रमाणे, चंदन पावडर लावून आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ घातले जातील. पर्यावरणासाठी प्राणीही इतर गोष्टींबरोबर तितकेच महत्वाचे असतात, हा संदेश या महोत्सवातून दिला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App