‘या’ दिवशी होणार मतदान, कधी येणार निकाल.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rajya Sabha महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही. दरम्यान, भारताच्या निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी अधिसूचनाही जारी केली आहे. मंगळवारी (26 नोव्हेंबर) जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.Rajya Sabha
राज्यसभा निवडणुकीचे निकाल कधी जाहीर होणार?
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा केली आहे. तर निवडणूक निकालही त्याच दिवशी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी जाहीर होतील. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो, परंतु लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. राज्यसभा, संसदेचे वरचे सभागृह कधीही विसर्जित होत नाही, परंतु लोकसभा विसर्जित केली जाऊ शकते.
राज्यसभेच्या ज्या सहा जागांसाठी 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे, त्यामध्ये आंध्र प्रदेशच्या तीन जागांचा समावेश आहे. याशिवाय पुढील महिन्यात पश्चिम बंगाल, हरियाणा आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या सर्व 6 जागा विद्यमान खासदारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाल्या आहेत.
सध्या राज्यसभेच्या एकूण 250 जागा आहेत. त्यापैकी 238 जागांसाठी अप्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. तर 12 सदस्य भारताचे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. लोकसभेच्या 445 जागांपैकी 443 जागांची निवड सार्वजनिक मताद्वारे केली जाते, तर दोन जागांसाठी सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App