7 राज्यांतील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

10 जुलै रोजी मतदान होणार, 13 जुलैला निकाल लागणार आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील 7 राज्यांतील 13 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 7 राज्यांतील 13 विधानसभा जागांसाठी 10 जुलै रोजी मतदान होणार आहे. 13 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहेत.Election results declared for 13 assembly constituencies in 7 states voting to be held on July 10



 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील 1, मध्य प्रदेशातील 1, उत्तराखंडमधील 2, पंजाबमधील 1, हिमाचलमधील 3, बिहारमधील 1 आणि बंगालमधील 4 जागांवर 10 जुलै रोजी मतदान होणार आहे. या जागांची अधिसूचना 14 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 जून निश्चित करण्यात आली आहे.

24 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 जून निश्चित करण्यात आली आहे. यानंतर 10 जुलैला मतदान होणार असून 13 जुलैला निकाल लागणार आहे. नुकत्याच देशात लोकसभा निवडणुका संपल्या. लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली.

Election results declared for 13 assembly constituencies in 7 states voting to be held on July 10

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात