भाजपकडून जास्त जागा खेचण्यासाठी अजितदादा + शिंदेंची घासाघाशी; पण नाराज नेते पक्षात टिकवताना घामफुटी!!


2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपकडून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त जागा खेचून घेण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची घासाघीस सुरू आहे, पण तिकीट मिळाले नाही, तर हमखास बंडखोरी करणाऱ्या आपल्याच नेत्यांना आपल्या पक्षात टिकवताना दोन्ही नेत्यांना घाम फुटत आहेत!! Eknath shinde and ajit pawar trying to snatch more seats from BJP, but unable to hold their flock together!!

महाराष्ट्रात 48 जागांपैकी भाजप, शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी नेमक्या किती जागा लढवणार??, याचा अधिकृत आकडा महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांनी अजून जाहीर केलेला नाही. तो आकडा जाहीर करण्यापूर्वीच भाजपने महाराष्ट्रातले 20 उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये फार भाकऱ्या फिरवल्या नाहीत. चारच खासदारांची तिकिटे कापली, पण किरकोळ नाराजीचे सूर वगळता कुठेही बंडखोरीचे ढोल वाजले नाहीत. उलट गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडे यांच्यासारखे खासदार आपण पक्षाचेच काम करणार असे ठामपणे सांगत राहिले. त्या उलट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना नेमक्या किती जागा लढवायला मिळणार??, याची कुठलीच खात्री नसताना त्यांच्या पक्षांमध्ये मात्र अस्वस्थतेची कारंजी उडाली आहेत.

एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आणि अजित पवारांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे हे अजितदादांविरुद्ध रणशिंग फुंकायला तयार झाले आहेत. ते आजच मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला “वर्षा”वर पोहोचले, पण तिथे त्यांना 5 तास ताटकळत बसावे लागले, अशी बातमी मराठी माध्यमांनी दिली. याचा अर्थच शिवतारेंच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैराण झाल्याचा अर्थ काढला जातो आहे. बारामतीत शिवतारे उभे राहून यांनी अजितदादांचे नुकसान केले, तर त्याचा “बदला” ठाणे – कल्याण मध्ये घेऊ अशी दमबाजी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंना चालवली आहे. पण दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीतले पारनेरचे आमदार निलेश लंके स्वतःहून फुटून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात धरायला गेले आहेत, त्यामुळे अजितदादांचा गट हैराण झाला आहे.


सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


नगरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आव्हान देण्याची त्यांची इच्छा होती. भाजपने स्वतःच्या खासदाराचे तिकीट कापून नगरची जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकावी. किंबहुना ती अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी खेचून घ्यावी, अशी निलेश लंकेंची अपेक्षा होती. पण कुठल्याही एका आमदाराच्या इच्छेबरहुकूम चालायला भाजप म्हणजे काय सध्याची काँग्रेस किंवा दोन्ही पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे, त्यामुळे भाजपने सुजय विखे यांचे तिकीट कापणे तर सोडाच, उलट महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीतच त्यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे निलेश लंके अजित पवारांवर नाराज होऊन शरद पवारांकडे निघून गेले. हे म्हणजे ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असेच झाले. यापलीकडे त्याला फारसे महत्त्व नाही, मग भले मराठी माध्यमांनी कितीही त्याच्या बडेजावाच्या बातम्या दिल्या, तरी निलेश लंकेची शरद पवारांच्या बळावर सुजय विखेंना आव्हान देण्याची क्षमता नाही.

एकीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही अवस्था असताना दुसरीकडे मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभेच्या मैदानात उतरतो आहे. त्यासाठी गजानन कीर्तिकर स्वतःच माघार घेणार आहेत, असे बोलले जात आहे, पण गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि अमोल कीर्तिकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. तिथे सुद्धा ताटातले वाटीत आणि वाटातले वाटले ताटात असलाच प्रकार आहे. त्यापलीकडे दोन्ही शिवसेनांना तिथे खासदारकीचा वेगळा उमेदवारच उपलब्ध नाही.

एकनाथ शिंदेंची शिवसेना काय किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी काय किंवा अगदी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या चारही पक्षांची अवस्था अशी आहे की, त्यांच्याकडे स्वतःचे असे तगडे उमेदवार लोकसभेच्या रणमैदानात उतरवण्यासाठी उपलब्धच नाहीत.

त्यातही ठाकरे – पवारांचे महायुतीतल्या संभाव्य गळतीकडे त्यांचे लक्ष आहे. महायुतीत एखादा नेता नाराज झाला, एखाद्याचे तिकीट कापले की, लगेच त्याच्यावर झडप घालायची आणि त्याला आपल्या तिकिटावर उभे करायचे यासाठी ठाकरे आणि पवारांचे पक्ष जाळे टाकून बसले आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे दोन-तीन नेते अडकण्याची शक्यता आहे. पण याचा खरा अर्थ हा की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तसे “लिमिटेडच ऑप्शन्स” आहेत, तरी देखील त्यांची भाजपशी जास्त जागा मिळवण्यासाठी घासाघीस सुरू आहे, पण स्वतःच्या पक्षातले नाराज नेते पक्षातच टिकवून धरताना अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना घाम फुटत आहे, अशी त्यांची आजची अवस्था आहे!!

Eknath shinde and ajit pawar trying to snatch more seats from BJP, but unable to hold their flock together!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात