आठ नौदल अधिकारी कतार मधून सुरक्षित भारतात; मोदी सरकारचा मोठा राजनैतिक विजय!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा राजनैतिक विजय मिळवत आठ नौदल भारतीय अधिकाऱ्यांना कतार मधून सुरक्षित भारतात आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हस्तक्षेप करत नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करवून घेतली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुत्सद्देगिरीची शर्थ करून कतार मधील तुरुंगात खितपत पडलेल्या या अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे सोडवून भारतात पाठवून दिले.Eight naval officers from Qatar safe in India; Big political victory of Modi government!!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैयक्तिक पातळीवर कतारच्या आमिरांशी संपर्क साधून या अधिकाऱ्यांची सुटका करवून घेतली. त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे शक्य झाले नसते. त्यांनी आमची खूप मदत केली, अशा शब्दांमध्ये या नौदल अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.



भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी कतारमध्ये 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली हेरगिरीचा आरोप ठेवून कतारच्या कोर्टाने या सर्वांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारने राजनैतिक हत्यारे वापरून संबंधित अधिकाऱ्यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करवून घेतली. त्यांना काही काळ तुरुंगात ठेवले. आता त्यापुढे जात कतारने एक मोठा निर्णय घेऊन या अधिकाऱ्यांना भारतात सुरक्षित परत येऊ दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत आणि कतार यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. भारताने कतारच्या या निर्णयाच स्वागत केले आहे. आठ पैकी सात भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत, अशी माहिती नवी दिल्लीतून देण्यात आली आहे.

2023 डिसेंबर महिन्यात कतारच्या एका कोर्टाने अल दहरा ग्लोबल प्रकरणात अटकेत असलेल्या भारतीय नागरिकांची मृत्यूदंडाची शिक्षा बदलली होती. ही शिक्षा तुरुंगवासात बदलली होती. भारत सरकारने मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात कतारच्या कोर्टात अपील केले होते. ते मान्य करण्यात आल्यानंतर हा निर्णय झाला होता.

कतारच्या ताब्यात कुठले भारतीय अधिकारी होते?

कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदु तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश हे आठ जण कतारच्या ताब्यात होते.

प्रकरण काय आहे?

अल दहरा कंपनीत भारती नौदलाचे हे आठ माजी अधिकारी काम करत होते. हेरगिरीच्या कथित प्रकरणात ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन कतार सरकार आणि भारत सरकार यांनी हे आरोप सार्वजनिक केले नाहीत. 26 ऑक्टोबर 2023 रोजी कतारच्या कोर्टाने या माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. कतारमधील कोर्टाने हा निर्णय घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा विषय महत्त्वाच असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत देऊन त्यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतात सुरक्षित परत आणले.

Eight naval officers from Qatar safe in India; Big political victory of Modi government!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात