तामिळनाडूमध्ये ED-ITचे छापे, AIADMK नेत्याच्या घरावर छापेमारी

पथकाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात राज्यात 25 ठिकाणी छापे टाकले ED IT raids in Tamil Nadu AIADMK leaders house raided

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) वेगाने छापेमारे करत आहे. गुरुवारी ईडी आणि आयकर विभागाच्या पथकाने तामिळनाडूमध्ये छापे टाकले. यादरम्यान, दोन्ही पथकांनी पहाटे मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि AIADMK नेते सी. विजयभास्कर यांच्या घरावर छापा टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात राज्यात 25 ठिकाणी छापे टाकले. वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ईडी आणि आयटी टीम होती जी स्क्वेअर ग्रुपच्या रिअल इस्टेट कंपनीशी संबंधित मालमत्तेची चौकशी करत आहेत. या मालमत्ता द्रमुकच्या सर्वोच्च नेतृत्वाशी निगडीत आहेत. ईडीची टीम मनी लाँड्रिंगच्या संशयावरून छापे टाकत आहे आणि प्रत्येक कागदपत्राची बारकाईने तपासणी करत आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी सकाळी AIADMK नेते सी. विजयभास्कर आणि चेन्नईस्थित रिअल इस्टेट समूहावर मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या संदर्भात छापे टाकले. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केंद्रीय एजन्सी सुमारे 25 ठिकाणी छापे टाकत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ED IT raids in Tamil Nadu AIADMK leaders house raided

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात