खळबळजनक : झारखंडमध्ये सापडलं घबाड! 6 मशीन, 12 तास, 30 कोटी रोख आणि मोजणी सुरूच…

झारखंडच्या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्य्काच्या नोकराच्या घरी EDची कारवाई ED action at house of servant of Jharkhand ministers personal assistant

विशेष प्रतिनिधी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथील एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात छापेमारीत एका खोलीतून जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधींची रोकड मोजण्यासाठी सहा मशीन सतत कार्यरत आहेत. गेल्या 12 तासांत 30 कोटी रुपये मोजले गेल्याचे सूत्रांनी सांगितले. आताही अनेक अधिकारी तेथे वसूल झालेले पैसे मोजण्यात व्यस्त आहेत. अधिका-यांनी सांगितले की, अनेक कॅश मोजण्याचे यंत्र तुटले असून नवीन आणण्यात आले आहेत.

ज्या खोलीत मोठी रोकड सापडली ती खोली झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचे नोकर जहांगीर यांची होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी झारखंड ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित सहा-सात जागांवर छापे मारताना ही रोकड उघडकीस आणली. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वीरेंद्र रामला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.

झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी झालेल्या या वसुलीने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. यात काँग्रेसच्या मंत्र्याचा संबंध असल्याचे भाजपने निदर्शनास आणून देत विरोधी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

निवडणूक प्रचारासाठी ओडिशात पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रोख वसुलीचा उल्लेख केला. केंद्राकडून तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराच्या विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी विचारले, “आज शेजारच्या झारखंड राज्यात चलनी नोटांचे डोंगर सापडत आहेत. आता मला सांगा, मी त्यांची चोरी, त्यांची कमाई, त्यांची लूट थांबवली तर? मग ते मोदींना शिव्या देतील की नाही? शिव्या देऊनही मी तुमचे पैसे वाचवावे की नाही.

ED action at house of servant of Jharkhand ministers personal assistant

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात