निवडणूक आयोगाचा “सर्वपक्षीय” दणका; 6 राज्यांचे गृहसचिव, मुंबई महापालिकेचे आयुक्त, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक यांना हटविले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याबरोबर संपूर्ण देशभर आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक सर्वपक्षीय दणका देऊन 6 राज्यांचे गृहसचिव, मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. ECI has issued orders for the removal of the Home Secretary in six states

निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशांच्या गृहसचिवांना पदावरून हटविले असून मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि दोन अन्य उपायुक्त यांना देखील पदावरून हटविले आहे. त्याचबरोबर मिझोराम आणि हिमाचल प्रदेशातल्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना देखील पदावरून दूर केले आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात वर उल्लेख केलेल्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.

यापैकी उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड मध्ये भाजपशासित राज्य आहे. बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दल यांचे शासन आहे. हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसचे शासन आहे, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसचे शासन आहे. त्यामुळे या सर्व राज्यांमधल्या अतिवरिष्ठ पदांवरच्या अधिकाऱ्यांना हटवून निवडणूक आयोगाने हा “सर्वपक्षीय” दणका दिला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचा प्रशासकीय आढावात्मक दौरा केला होता. या दौऱ्यात निवडणूक आयोगाला ज्या त्रुटी आढळल्या, त्या त्रुटींवर निवडणूक आयोगाने कार्यवाही केली आणि या कार्यवाहीचाच एक भाग म्हणून वर उल्लेख केलेल्या सर्व राज्यांमध्ये त्यांनी प्रशासकीय बदल करत 6 राज्यांचे गृहसचिव, 2 राज्यांचे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक, मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि दोन उपायुक्त यांना पदावरून दूर केले आहे. निवडणूक आयोगाची ही कार्यवाही निवडणूक आचारसंहिता लागू असेपर्यंत म्हणजे निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे.

ECI has issued orders for the removal of the Home Secretary in six states

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात