विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग अचानक वेगाने वाढल्याने ‘कोव्हॅक्स’ सुविधेला होणाऱ्या लस पुरवठ्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, ‘गॅवी’ आणि ‘सेपी’ या संस्थांनी म्हटले आहे. Due to corona wave in India vaccination plan shattered
लसीकरण मोहिम योग्य पद्धतीने सुरु असलेल्या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. मात्र, जागतिक पातळीवर सर्वत्र असे चित्र नाही. सर्वांपर्यंत लस पोहचविण्यासाठी ‘कोव्हॅक्स’ला या वर्षभरात लशींचे दोन अब्ज डोस मिळणे आवश्यतक असताना आशियातील, विशेषत: भारतातील संसर्ग वाढीमुळे त्यात अडथळा येण्याची शक्यता आहे.
भारतात संसर्ग वाढल्याने लस निर्यात आणि पुरवठ्यावर सरकारने बंधने आणली. ‘कोव्हॅक्स’मार्फत आतापर्यंत जगभरात १२६ देशांमध्ये ७ कोटी डोस पुरविण्यात आले आहेत. जगातील ३५ देशांमध्ये लसीकरण मोहिम ‘कोव्हॅक्स’च्याच बळावर सुरु झाली. मात्र, भारताकडून होणारा लस पुरवठा घटल्याने सध्या अडचणी येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘कोव्हॅक्स’ सुविधा केंद्रातर्फे येत्या काही दिवसांत लशींचे डोस पुरविण्याचा साडे सहा कोटींचा टप्पा पार केला जाणार आहे. वास्तविक आतापर्यंत या सुविधा केंद्राद्वारे लशींचे १७ कोटी डोस पुरविले जाणे अपेक्षित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App