DRDO चे अँटी कोरोना औषध 11 मेपासून होणार उपलब्ध, सुरुवातीला 10 हजार डोस येणार, रेड्डींची माध्यमांना माहिती

DRDO chief g satheesh reddy says DRDO Anti Covid Drug will be rolled out by may 11th

DRDO Anti Covid Drug : डीआरडीओचे बहुचर्चित अँटी कोरोना औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने नुकतीच मान्यता दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले की, 11 किंवा 12 मेपासून हे अँटी कोरोना औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल. ते म्हणाले की, सुरुवातीला 10 हजार डोस बाजारात येऊ शकतात. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. हे औषध बाजारात उपलब्ध झाल्यावर भारताच्या कोरोनाविरुद्ध लढ्याला वेग येऊन अनेकांचे प्राण वाचू शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. DRDO chief g satheesh reddy says DRDO Anti Covid Drug will be rolled out by may 11th


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डीआरडीओचे बहुचर्चित अँटी कोरोना औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने नुकतीच मान्यता दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले की, 11 किंवा 12 मेपासून हे अँटी कोरोना औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल. ते म्हणाले की, सुरुवातीला 10 हजार डोस बाजारात येऊ शकतात. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. हे औषध बाजारात उपलब्ध झाल्यावर भारताच्या कोरोनाविरुद्ध लढ्याला वेग येऊन अनेकांचे प्राण वाचू शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी म्हणाले, “डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी लॅब यांनी बनविलेले हे औषध डीसीजीआयने मंजूर केले आहे. या औषधामुळे ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या कोरोना रुग्ण 2-3 दिवसांत ऑक्सिजन सपोर्ट सोडू शकतील. ते लवकरच बरे होतील. लवकरच हे औषध आपल्याला रुग्णालयात उपलब्ध होईल. तथापि, त्यांनी असेही म्हटले आहे की, रुग्णांनी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध घ्यावे.

क्लिनिकल चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांला लवकर बरे करण्यास मदत करते. केवळ ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या रुग्णांमध्येही याचा मोठा फायदा दिसून आला आहे.

DRDO chief g satheesh reddy says DRDO Anti Covid Drug will be rolled out by may 11th

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात