राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस देशाला संबोधित केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला ज्ञान आणि विवेकाचा प्रारंभबिंदू मानले जात असे. तथापि, भारताला मधल्या काळात एका काळ्या कालखंडातून जावे लागले.
त्या म्हणाल्या की, आज, सर्वप्रथम, आपण त्या वीरांच्या आत्म्यांचे स्मरण केले पाहिजे ज्यांनी मातृभूमीला परकीय बंधनातून मुक्त करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्या म्हणाल्या की, यावर्षी आपण भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करत आहोत. देशाच्या इतिहासात ज्यांच्या भूमिकेला आता महत्त्व दिले जात आहे, अशा आघाडीच्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ते एक आहेत.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारताची लोकशाही मूल्ये आपल्या संविधान सभेच्या रचनेतही प्रतिबिंबित होतात. त्यात देशाच्या प्रत्येक भागाचे आणि सर्व समुदायांचे प्रतिनिधित्व होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान सभेत राजकुमारी अमृत कौर, सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता, मालती चौधरी आणि सुचेता कृपलानी या १५ असाधारण महिलांचाही समावेश होता.
त्या पुढे म्हणाल्या की, भारतातील शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवले आहे. आपल्या कामगार बंधू-भगिनींनी अथक परिश्रम केले, ज्यामुळे आपल्या पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्राचे परिवर्तन शक्य झाले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच भारताची अर्थव्यवस्था जगात चमकत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App