सात जणांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित होणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रपतींनी १३९ पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. रात्री उशीरा जाहीर झालेल्या यादीत सात पद्मविभूषण आणि १९ पद्मभूषण यांचा समावेश आहे. याशिवाय ११३ पद्मश्री पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये २३ महिलांचा समावेश आहे. या यादीत १० परदेशी, अनिवासी भारतीय, पीआयओ, ओसीआय श्रेणीतील व्यक्तींचा समावेश आहे. त्याच वेळी, १३ मरणोत्तर पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भोजपुरी गायिका शारदा सिन्हा (मरणोत्तर), न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंग खेहर आणि सुझुकी कंपनीचे ओसामू सुझुकी (मरणोत्तर), बिबेक देबरॉय, सुशील मोदी आणि मनोहर जोशी (मरणोत्तर) यांची नावे समाविष्ट आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी रात्री पद्म पुरस्कारांची घोषणा केली. सिन्हा यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी, खेहर यांना सार्वजनिक व्यवहारांसाठी आणि सुझुकी यांना व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पद्मविभूषण पुरस्काराचे इतर मानकरी दुव्वुर नागेश्वर रेड्डी (वैद्यक), कुमुदिनी रजनीकांत लाखिया आणि लक्ष्मीनारायणन सुब्रमण्यम (कला), एमटी वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य-शिक्षण) यांचा समावेश आहे.
याशिवाय, ए सूर्य प्रकाश, राम बहादूर राय (साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता), अनंत नाग आणि जतिन गोस्वामी, नंदमुरी बालकृष्ण, पंकज उधास (मरणोत्तर), एस अजित कुमार, शेखर कपूर, शोभना चंद्रकुमार (कला), जोस चाको पेरियाप्पुरम (वैद्यकशास्त्र), कैलाशनाथ दीक्षित (पुरातत्वशास्त्र), नल्ली कुप्पुस्वामी चेट्टीयार, पंकज पटेल (व्यवसाय आणि उद्योग), पीआर श्रीजेश (क्रीडा), साध्वी ऋतंभरा (समाजकार्य), विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात बिबेक देबरॉय यांना तर सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात सुशील मोदी आणि मनोहर जोशी यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
याशिवाय, महाराष्ट्रातील विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार, अच्युतराव पालव, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री अश्विनी भिडे देशपांडे, जस्पिंदर नरुला, राणेंद्र मुजुमदार, सुभाष शर्मा, वासुदेव कामथ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर याशिवाय पद्मभूषण पुरस्कारांमध्ये दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी(मरणोत्तर), पंकज उदास(मरणोत्तर), शेखर कपूर यांची नावे महाराष्ट्रामधून आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App